भारत, चीन आणि इराण यांच्या अफगाणिस्तानमधील दूतावासांवर आक्रमण करणार  

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून समोर आली इस्लामिक स्टेट(खुरासान)ची धमकी !

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचा क्षमा मागण्यास नकार !

संसदेतच एका खासदाराविषयी अपशब्द वापरण्यातून खासदारांची नैतिकता किती शिल्लक आहे, हे लक्षात येते !

भारतावर निर्बंध लादण्याचा विचार नाही ! – कैरेन डॉनफ्राइड, साहाय्यक परराष्ट्रमंत्री, अमेरिका

भारत रशियाकडून तेल खरेदी करत असला, तरी अमेरिका त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध लादणार नाही, असे वक्तव्य अमेरिकेचे साहाय्यक परराष्ट्रमंत्री कैरेन डॉनफ्राइड यांनी केले आहे. ‘नैतिकतेच्या संदर्भात भारत आणि अमेरिका यांचे दृष्टीकोन वेगवेगळे आहेत.

विरोधकांना देशाची क्षमता आणि सामर्थ्‍य यांच्‍या वाढीमुळे निराशा ! – पंतप्रधान मोदी

काँग्रेसच्‍या काळात देशात आतंकवाद, हिंसाचार आणि घोटाळे वाढल्‍याचा आरोपही त्‍यांनी केला. ‘पायाखाली भूमी नाही, असे असतांनाही तुम्‍हाला त्‍याची जाणीव नाही’, असा टोलाही त्‍यांनी विरोधकांना लगावला.

तिहार कारागृहाच्‍या खंडणीखोर कारागृह अधिकार्‍याला अटक !

असे पोलीस जनतेचे रक्षक नव्‍हे, तर भक्षक ! अशांचा भरणा असलेले पोलीसदल कायदा आणि सुव्‍यवस्‍था काय राखणार ?

आता रेल्‍वेत व्‍हॉट्‍सअ‍ॅपवरून मागवता येईल आवडत्‍या उपाहारगृहांमधून जेवण !

प्रवाशांना ८७५०००१३२३ या क्रमांकावर अन्‍नपदार्थ मागवता येणार आहे. त्‍याद्वारे प्रवासात प्रवाशाला त्‍याच्‍या आवडत्‍या उपाहारगृहांमधून जेवण मागवता येईल.

भारतातील २३८ शहरांमध्‍ये ५ जी सेवा उपलब्‍ध !

१ ऑक्‍टोबर २०२२ पासून आस्‍थापनांनी भ्रमणभाषशी संबंधित ५ जी सेवा पुरवण्‍यास आरंभ केला असून ३१ जानेवारी २०२३ पर्यंत देशातील २३८ शहरांमध्‍ये ही सेवा पुरवण्‍यात आली आहे.

कॅलिफोर्निया (अमेरिका) येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकमेव पुतळ्याची चोरी !

अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील सॅन जोस उद्यानातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चोरीला गेल्याची घटना घडली आहे. हा पुतळा चक्क कापून चोरी करण्यात आला आहे. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.

प्लास्टिक बाटल्यांचा पुनर्वापर करून बनवलेला जॅकेट घालून पंतप्रधान मोदी पोचले संसदेत !

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ८ फेब्रुवारी या दिवशी संसदेत फिकट निळ्या रंगाचे जॅकेट परिधान करून आले होते. हे जॅकेट कापडाचे नसून पुनर्वापर करण्यात आलेल्या प्लास्टिकच्या बाटलीपासून बनवण्यात आले आहे.