नवी देहली – तिहार कारागृहाचे कारागृह अधिकारी योगेश मीणा यांना माजी आय.ए.एस्. अधिकारी जी.एस्. मीणा यांच्याकडे १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली. योगेश मीणा यांनी जी.एस्. मीणा यांना भ्रमणभाष करून ‘७ दिवसांत १० कोटी रुपये न दिल्यास तुला ठार मारणार’, अशी धमकी दिली होती. यानंतर जी.एस्. मीणा यांनी तुघलक मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती.
तिहाड़ जेल का पूर्व वार्डन योगेश मीणा रंगदारी मांगने के मामले में गिरफ्तार, रिटायर्ड #IAS से मांगे थे 10 करोड़
— AajTak (@aajtak) February 8, 2023
योगेश मीणा त्यांच्या साथीदारांना हाताशी धरून जी.एस्. मीणा यांना वारंवार धमकावत होते. या प्रकरणी जी.एस्. मीणा यांनी तिहार कारागृहाच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे योगेश मीणा यांची तक्रार केली. त्याची नोंद घेत योगेश मीणा यांना पदावरून बडतर्फ करण्यात आले. त्यानंतर योगेश मीणा हे जी.एस्. मीणा यांना फेसबुकवरून धमक्या देऊ लागले. याची नोंद घेऊन पोलिसांनी योगेश मीणा यांना अटक केली. त्याच्या २ साथीदारांचाही शोध चालू आहे.
संपादकीय भूमिका
|