नवी देहली – भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी ‘व्हॉट्सअॅप फूड डिलिव्हरी’ योजनेचा शुभारंभ केला आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना त्यांच्या तिकिटाच्या ‘पीएन्आर्’ क्रमांकाचा वापर करावा लागणार आहे. प्रवाशांना ८७५०००१३२३ या क्रमांकावर अन्नपदार्थ मागवता येणार आहे. त्याद्वारे प्रवासात प्रवाशाला त्याच्या आवडत्या उपाहारगृहांमधून जेवण मागवता येईल.
पहिल्या टप्प्यात ग्राहकांना ई-तिकिट बुक केलेल्या क्रमांकावर संदेश पाठवला जाईल. या संदेशामध्ये त्यांना संकेतस्थळाची मार्गिका पाठवली जाईल. त्यावर क्लिक केल्यानंतर प्रवाशांना ई-केटरिंगची सुविधा निवडता येईल. या पर्यायाद्वारे प्रवाशांना रेल्वेस्थानकावर उपलब्ध आवडत्या रेस्टॉरंटमधून जेवण मागवता येईल. यासाठी प्रवाशांना कोणतेही वेगळे अॅप डाऊनलोड करण्याची आवश्यकता भासणार नाही.