भारतावर निर्बंध लादण्याचा विचार नाही ! – कैरेन डॉनफ्राइड, साहाय्यक परराष्ट्रमंत्री, अमेरिका

कैरेन डॉनफ्राइड, साहाय्यक परराष्ट्रमंत्री

नवी देहली – भारत रशियाकडून तेल खरेदी करत असला, तरी अमेरिका त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध लादणार नाही, असे वक्तव्य अमेरिकेचे साहाय्यक परराष्ट्रमंत्री कैरेन डॉनफ्राइड यांनी केले आहे. ‘नैतिकतेच्या संदर्भात भारत आणि अमेरिका यांचे दृष्टीकोन वेगवेगळे आहेत. दोन्ही देश आंतरराष्ट्रीय नियमांवर आधारित व्यवस्था कायम ठेवण्यासाठी कटीबद्ध आहेत’, असेही ते म्हणाले. युक्रेनच्या एका नेत्याने ‘भारताने रशियाकडून तेल विकत घेणे चालू ठेवले, तर त्याच्यावर निर्बंध घालणे आवश्यक आहे’, असे वक्तव्य केले होते. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना डॉनफ्राइड यांनी वरील वक्तव्य केले.