बनावट औषधे बनवणार्‍या १८ फार्मा आस्थापनांचे परवाने रहित !

जनतेच्या आरोग्याशी खेळणार्‍या संबंधितांना कठोर शिक्षा व्हायला हवी !

दलाई लामा यांच्याकडून ८ वर्षीय मुलाला बौद्ध धर्मातील तिसरा सर्वांत महत्त्वाचा नेता म्हणून घोषित !

सामाजिक माध्यमांवर या कार्यक्रमाची छायाचित्रे प्रसारित झाली आहेत. या छायाचित्रांमध्ये ८७ वर्षीय दलाई लामा लाल वस्त्रे परिधान केलेल्या आणि मुलाला भेटतांना दिसत आहेत. या मुलाचे नाव अद्याप समोर आलेले नाही.

दारुच्या प्रत्येक बाटलीवर १० रुपये गोमाता अधिभार आकारणार !

असा अधिभार आकारून पैसे गोळा करण्यासह सरकारने गोरक्षणासाठी विशेष तरतूद करण्याचीही आवश्यकता आहे !

काँग्रेसने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय शिवरात्री महोत्सवात ‘अल्लाह हू’चे गाणे !

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याची काँग्रेसची ही जुनीच खोड आहे.  नुकत्याच झालेल्या हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विजयी झाल्याने तेथे काँग्रेस सरकारकडून हिंदु धर्मावर असेच आघात होत राहिल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

(म्हणे) ‘ज्या राज्यात ९७ टक्के हिंदू रहातात, तेथे आम्ही हिंदुत्वाची विचारसरणी असणार्‍या भाजपला पराजित केले !’

भाजपचा पराभव करून हिंदुत्वाचा पराभव केल्याचा आव आणून काँग्रेसने तेथे हिंदुविरोधी धोरणे राबवल्यास तेथील हिंदु समाज काँग्रेसचे राजकीय अस्तित्व संपवेल, हेही काँग्रेसवाल्यांनी लक्षात ठेवणे आवश्यक !

सुखविंदर सुक्खू यांनी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ

तसेच त्यांच्या समवेत मुकेश अग्निहोत्री यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र विश्‍वनाथ आर्लेकर यांनी त्यांना शपथ दिली.

गुजरातमध्ये पुन्हा भाजपची सत्ता, तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा विजय !

गुजरातमध्ये भाजपला १८२ पैकी १५७ जागा मिळाल्या आहेत. इतक्या मोठ्या संख्येने भाजपला पहिल्यांदाच जागा मिळाल्या आहेत.

हिमाचल प्रदेश विश्‍वविद्यालयात साम्यवाद्यांच्या विद्यार्थी संघटनेकडून अभाविपच्या कार्यकर्त्यांना मारहाण

साम्यवाद्यांचा इतिहास हा हिंसाचाराचाच असल्याने त्यांच्याकडून याहून वेगळे काही घडण्याची शक्यता नाही. हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे !

गुजरातनंतर आता हिमाचल प्रदेशातही समान नागरी कायदा लागू करण्याचे भाजपचे आश्‍वासन !

एकेका राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याऐवजी केंद्रातील भाजप सरकारने संपूर्ण देशातच तो लागू होण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, असेच हिंदु राष्ट्रप्रेमींना वाटते !

पाकव्याप्त काश्मीर परत घ्या !

भारतीय नागरिक आता थेट संरक्षणमंत्र्यांकडे उघडपणे ही मागणी करू लागणे,  हे ते जागृत झाल्याचेच लक्षण आहे ! ही भारतियांसाठी उत्साहाची घटना आहे. आता त्यांनी सरकारवर दबाव आणून सरकारला पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यास भाग पाडले पाहिजे !