हिमाचल प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांचे हिंदुद्वेषी विधान
शिमला (हिमाचल प्रदेश) – हिमाचल प्रदेशचे काँग्रेस सरकारचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी केलेले एक विधान सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.
जिस राज्य में 97% हिंदू हो वहाँ हमने हिंदुत्व की विचारधारा को हराया है – सुखविंदर सुखु, हिमाचल कांग्रेस नेता pic.twitter.com/E6DZLGKegG
— Tajinder Pal Singh Bagga (@TajinderBagga) December 10, 2022
यात त्यांनी ‘ज्या राज्यात ९७ टक्के हिंदू रहातात, तेथे आम्ही हिंदुत्वाची विचारसरणी असणार्या भाजपला पराजित केले’, असे म्हटले आहे. (भाजप का पराजित झाला आणि तेथील जनतेने हिंदुद्वेषी काँग्रेसला का निवडून आणले, यामागे विविध कारणे असू शकतात; मात्र भाजपचा पराभव करून हिंदुत्वाचा पराभव केल्याचा आव आणून काँग्रेसने तेथे हिंदुविरोधी धोरणे राबवल्यास तेथील हिंदु समाज काँग्रेसचे राजकीय अस्तित्व संपवेल, हेही काँग्रेसवाल्यांनी लक्षात ठेवणे आवश्यक ! – संपादक)