मणीपूरमध्ये हिंसाचार चालूच !

मणीपूरमध्ये गेल्या मासाभरापासून चालू असलेला हिंसाचार थांबलेला नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौर्‍यानंतरही येथे हिंसाचार चालूच आहे. गेल्या २४ घंट्यांत मैतेई आणि कुकी या समाजांच्या गावांवर झालेल्या आक्रमणांत  अनेक लोक घायाळ झाले.

मणीपूर राज्यातील हिंसाचाराची सीबीआय आणि न्यायालयीन चौकशी होणार ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

ते मणीपूरच्या ४ दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन तेथील स्थितीची माहिती घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत वरील घोषणा केली.

मणीपूरमध्ये पुन्हा हिंसाचार : १० जणांचा मृत्यू, तर ४०० घरे पेटवली

मणीपूर येथे हिंदु आणि ख्रिस्ती मागासवर्गीय यांच्यात गेल्या काही आठवड्यांपासून चालू असलेल्या हिंसाचाराचा २८ मे या दिवशी पुन्हा भडका उडाला. या दिवशी राज्यात झालेल्या विविध घटनांत एका महिलेसह १० जणांचा मृत्यू झाला.

ख्रिस्ती असलेल्या कुकी आतंकवाद्यांनी ‘मेईतेई’ या हिंदु समाजाची घरे जाळली !

ख्रिस्ती असलेल्या कुकी आतंकवाद्यांनी राज्यातील बिष्णुपूर जिल्ह्यात असलेल्या ट्रोंगलाबी येथील अनेक दुकाने, घरे आणि वाहनांना आग लावली, तसेच गोळीबारही केला.

मणीपूरमध्ये २ समुदायांतील हिंसेत आयकर अधिकार्‍याची हत्या !

मणीपूरमध्ये आदिवासी आणि बिगर आदिवासी समुदायांमध्ये चालू असलेल्या हिंसेत लेमिनथांग हाओकिप नावाच्या एका आयकर अधिकार्‍याची हत्या करण्यात आली.

मणीपूरमधील हिंसाचार रोखण्यासाठी सैन्य तैनात !

मैती समाजाच्या संदर्भातील उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थानिक आदिवासींकडून होत आहे विरोध !

मणीपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या पूर्वी आदिवासी ख्रिस्त्यांकडून तोडफोड !

अवैध चर्च पाडल्याच्या विरोधात करत होते आंदोलन !
तोडफोड करणारे आदिवासी धर्मांतरित ख्रिस्ती असल्याचे सांगितले जात आहे !

मणीपूरमध्ये भाजपच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या

यानंतर मुख्य आरोपीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या प्रकरणी आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली.

मणीपूर राज्यात आदिवासी संघटनांकडून जाळपोळ आणि तोडफोड !

मागण्या मान्य न झाल्याने राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात आंदोलन !

म्यानमारमध्ये दोन तमिळ तरुणांची गोळ्या झाडून हत्या

मणीपूर राज्यातील मोरेह शहरातून म्यानमार देशातील तामू शहरामध्ये गेलेल्या पी. मोह आणि एम्. अय्यरनार या दोन तरुणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या डोक्यात अगदी जवळून गोळ्या झाडण्यात आल्या.