मणीपूर येथील महिलांना विवस्त्र केल्याच्या प्रकरणी आतापर्यंत ४ जणांना अटक !

एका आरोपीचे घर जमावाने पेटवले !

इंफाळ (मणीपूर) – मणीपूरमध्ये २ महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढल्याच्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ४ जणांना अटक केली आहे. दुसरीकडे जमावाने या ४ पैकी एका आरोपीचे घर पेटवून दिले.

महिलांवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ २० जुलैला मणीपूरच्या चुराचंदपूरमध्ये निदर्शने करण्यात आली. या वेळी सहस्रो लोकांनी काळे कपडे परिधान करून निदर्शने करत आरोपींच्या अटकेची मागणी केली.