रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

१. श्रीमती वनिता पाटील (हातकणंगले तालुका अध्यक्ष, शिवसेना (शिंदे गट), कोल्हापूर, महाराष्ट्र.)

अ. ‘मला आश्रम पहातांना दैवी चैतन्य जाणवले.

आ. साधकांचा सेवाभाव पाहून ‘आपणही अशा ईश्वरीय कामाचे सेवक व्हावे’, असे मला वाटले.’

२. सौ. सुप्रिया पाटील (धर्मरक्षा अध्यक्ष, पदवीधर जैन संघटन, कोल्हापूर, महाराष्ट्र.)

अ.‘आश्रम पाहून खरोखरच माझे मन प्रसन्न झाले.

आ. मला इथे पुष्कळ वेगवेगळ्या गोष्टींची आणि खरी माहिती समजली.

इ. मला इथे पुष्कळ वेगळा आणि सकारात्मक अनुभव आला.

ई. या आश्रमात आल्यानंतर माझ्या मनात सकारात्मक विचार येतात.

उ. आश्रमाची सर्व माहिती अतिशय अनमोल आहे.

ऊ. ‘प्रत्येक व्यक्तीने आश्रमात येऊन स्वतःमध्ये पालट करावेत’, असे मला वाटते.

ए. साधना केल्याने मनाला वेगळा अनुभव अनुभवता येतो.’

३. श्री. भगवंत जांभळे (जिल्हा उपाध्यक्ष (मनसे), कोल्हापूर, महाराष्ट्र.)

अ. ‘आश्रम पाहून मला पुष्कळ चांगले आणि सकारात्मक वाटले.

आ. मला आश्रमात दैवी वास्तव्य जाणवले.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : २४ .६.२०२४)