रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

 १. श्री. सिद्धाप्पा बी. यू. (उत्तर कर्नाटक धर्म संचालन प्रमुख, युवा ब्रिगेड), कल्लोळ्ळी, बेळगाव, कर्नाटक. 

अ. ‘मला आश्रम पाहून चांगले आणि नवीन अनुभव आले.

आ. ‘हिंदु शक्तीचे संघटन होण्यासाठी आश्रमातील कार्य फार आवश्यक आहे’, असे मला वाटले.’

२. श्री. चंद्रशेखर के. (धर्म संचालन समन्वयक, दक्षिण भारत, युवा ब्रिगेड), बेंगळुरू, कर्नाटक. 

अ. ‘मला आश्रमात चांगला अनुभव आला आणि चांगली माहिती मिळाली.

आ. माझे मन सकारात्मक झाले आणि मला शांत वाटले.’

३. श्री. जया सालियन (विश्वस्त, श्रीब्रह्म लिंगेश्वर मंदिर), दक्षिण कन्नड, कर्नाटक. 

अ.  ‘मला आश्रम पाहून समाधान वाटले.

आ. ‘आपल्या जीवनात पालट करून नवीन जीवन जगण्यासाठी साधना आवश्यक आहे’, हे माझ्या लक्षात आले.

इ. मी ध्यान करत असतांना मला भगवंताचे दर्शन झाले.

ई. ‘हे सर्व साधनेने अनुभवू शकतो’, असे मला वाटले.’

४. श्री. रामांजनेया (अध्यक्ष, श्री लक्ष्मी वेंकटेश्वर मंदिर), शिकारीपूर, शिवमोग्गा, कर्नाटक. 

अ. ‘आश्रम देवीस्वरूप आहे’, हे पहायला २ डोळेही अल्प पडतात.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : २५.६.२०२४)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार मान्यवरांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक