‘औरंगजेब जुलमी नव्हता, तर अखंड भारत निर्माण करणारा होता !’ – काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद

काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद यांच्याकडून औरंगजेबाचे समर्थन

काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद

नवी देहली – औरंगजेब जुलमी नव्हता, तर तो एक अखंड भारत निर्माण करणारा बादशाह होता. चित्रपट बनवून इतिहास पुसता येत नाही, असे विधान उत्तरप्रदेशातील काँग्रेसच खासदार इम्रान मसूद यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. अबु आझमी यांच्या औरंगजेबाविषयीच्या विधानाचे समर्थन करतांना मसूद बोलत होते.

इम्रान मसूद म्हणाले की, लोकांना योग्य ज्ञान मिळाले पाहिजे. औरंगजेब ४९ वर्षे या देशाचा बादशाह होता, तो जुलमी कसा असू शकतो ? त्याच्या राज्यात जीडीपी (सकल राष्ट्रीय उत्पन्न) कुठे होते ? कैलास मानससरोवरला कुणी विजय मिळवून दिला ? अफगाणिस्तान, ब्रह्मदेश आदींपर्यंत अखंड भारताची निर्मिती कुणी केली ? हे सर्व औरंगजेबाच्या काळात घडले. द्वेषाने भरलेला भाजप या देशाला कुठे घेऊन जाईल ? द्वेषाचे राजकारण देशाची हानी करेल. २५ कोटी लोकांना बाजूला करता येणार नाही.

संपादकीय भूमिका

  • काँग्रेस म्हणजेच दुसरे मोगल असल्याने त्यांच्या मुसलमान खासदारांकडून याहून वेगळे काय घडणार ?
  • भारत पूर्वीपासून अखंड होता, तो मोगलांनी अखंड केला नाही, हा इतिहास असतांना लोकांची दिशाभूल करण्याचाच प्रयत्न मसूद करत आहेत. खोटा इतिहास सांगितल्यावरून अशांना कारागृहात टाकले पाहिजे आणि त्यांची खासदारकी रहित केली पाहिजे !