फाल्गुन शुक्ल पंचमी (४.३.२०२५) या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणार्या सौ. लक्ष्मी नारायण पाटील (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्या घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यातील साधिकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
सौ. लक्ष्मी नारायण पाटील यांना ३५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

१. सुश्री (कु.) मनीषा शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
अ. ‘सौ. लक्ष्मी नारायण पाटील या माझ्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतात. लक्ष्मीताई आढावा घेत असतांना काही वेळा ‘त्यांच्याकडून आम्हाला आवश्यक असलेले मारकतत्त्व किंवा तारकतत्त्व प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवते. त्यामुळे मला आनंद मिळतो आणि माझा व्यष्टी साधना करण्याचा उत्साह वाढतो.
आ. ताई माझ्या चुकीमागील मूळ स्वभावदोष शोधून काढण्यासाठी मला प्रश्न विचारतात आणि अंतर्मुख करतात. त्या वेळी ‘माझ्या देहावरील त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट होते’, असे मला जाणवते.
इ. ताई आढावा घेत असतांना काही वेळा मला सूक्ष्मातून श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवते. तेव्हा मला एका पोकळीत गेल्यासारखे वाटते. त्या वेळी माझ्या मनातील सर्व प्रश्न सुटतात आणि मला हलके वाटते.’
२. श्रीमती शशिकला भगत (वय ६८ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
अ. ‘लक्ष्मीताईंचे बोलणे ऐकतच रहावे’, असे मला वाटते.
आ. ‘जेव्हा त्या मला स्वभावदोष-निर्मूलनाविषयी मार्गदर्शन करतात, तेव्हा माझ्यामध्ये पालट होत आहे’, असे मला वाटते आणि माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त होते.’
(लिखाणातील सर्व सूत्रांचा दिनांक : २२.२.२०२५)
|