लोटे औद्योगिक वसाहतीत वायूगळती झाल्याने खळबळ


खेड – लोटे औद्योगिक वसाहतीतील ‘लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रिज’ या आस्थापनात २३ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी वायूगळती झाल्याने खळबळ उडाली. वायूगळतीचा एका कामगारास किरकोळ त्रास झाल्याचे समजते. आस्थापनाने सर्व कामगारांना तातडीने बाहेर काढण्यात आल्याने अनर्थ टळला.


वायूगळती आटोक्यात आणण्यासाठी लोटे औद्योगिक क्षेत्राची अग्नीशमन यंत्रणा आणि तंत्रज्ञ तातडीने घटनास्थळी पोचले. साहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील हेही पोलीस कर्मचार्‍यांसह घटनास्थळी पोचले. सायंकाळी विलंबाने वायूगळती नियंत्रणात आणण्यात यश आल्याचे सांगण्यात आले.