Farah Khan’s Holi Insult : होळी हा छपरी लोकांचा (टवाळखोरांचा) आवडता सण !

  • फराह खान यांचे हिंदुद्वेषी विधान

  • फराह खान यांनी क्षमा मागण्याची संतप्त हिंदूंची मागणी !

मुंबई – चित्रपट दिग्दर्शिका फराह खान ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ मध्ये परीक्षक होत्या. अलीकडेच या कार्यक्रमाच्या एका भागात होळीविषयी टिपणी करतांना फराह खान म्हणाल्या होत्या की, होळी हा सर्व छपरी लोकांचा (टवाळखोरांचा) आवडता सण आहे. याविषयी हिंदूंनी संताप व्यक्त केला असून फराह खान यांनी क्षमा मागावी, अशी मागणी हिंदूंनी केली आहे.

१. या व्हिडिओमध्ये अभिनेते गौरव खन्ना आणि शेफ विकास खन्ना पार्श्वभूमीत एकमेकांशी बोलत असल्याचे दिसत आहे, तर फराह खान कॅमेर्‍याकडे पाहून म्हणते, ‘ होळी हा सर्व छपरी लोकांचा आवडता सण आहे.’

२. या टिपणीमुळे फराह खान यांचावर बरीच टीका होत आहे. याविषयी एका सामाजिक माध्यमावर एका हिंदूने लिहिले आहे की, ‘होळीला ‘छपरी बॉईज’चा (टवाळखोर मुलांचा) सण म्हणणार्‍या फराह खान यांच्यात धाडस असेल, तर त्यांनी ईदलाही असेच संबोधावे. हिंदु सणांचा अपमान करणे ही धर्मनिरपेक्षता नाही, तर मानसिक दिवाळखोरी आहे. क्षमा मागा, नाहीतर अशांना कसा प्रतिसाद द्यायचा ?, हे जनतेला माहीत आहे.’

३. या कार्यक्रमात अभिनेते गौरव खन्ना यांनी होळीला त्याचा ‘आवडता सण’ म्हटले होते. होळीला अभिवादन करतांना गौरव खन्ना यांनी एक खास ‘डिश’ (विशेष पदार्थ) सिद्ध केली होती आणि त्यात सर्व रंगांचा समावेश केला होता. शेफ विकास खन्ना आणि रणवीर ब्रार यांनी गौरव खन्ना यांचे कौतुक केले, तर फराह खान यांनी होळी हा छपरी लोकांचा आवडता सण आहे, अशी टिपणी केली होती.

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. –  संपादक)

संपादकीय भूमिका 

धर्मांध मुसलमान हिंदूंविरुद्ध गळकओक करण्याची एकही संधी सोडत नाही, हेच यावरून सिद्ध होते. अशांचे हिंदूंचे सण-उत्सव, देवता यांविषयी टिपणी करण्याचे धाडस होणार नाही, अशी पत हिंदूंनी निर्माण केली पाहिजे !