
कल्याण – १९ वर्षीय शेख जिया हुसेन याने कल्याण ते डोंबिवली दरम्यान धावत्या लोकलगाडीत ३ प्रवाशांवर चाकूने आक्रमण केले. त्याला मुंब्रा येथे उतरायचे होते; परंतु ‘मुंब्रा येथे गाडी थांबवणार नाही’, असे प्रवाशांनी सांगितले. त्या वेळी त्याने गाडीमधून उतरण्याचा प्रयत्न करतांना त्यांना सहप्रवाशांचा धक्का लागला. धक्का लागल्याच्या कारणावरून त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्या वादामध्ये आरोपीला प्रवाशांनी मारहाण केली. वादानंतर थेट खिशातील चाकू काढून प्रवाशांवर चाकूने आक्रमण केले. यात ३ प्रवासी गंभीर घायाळ झाले.
त्यानंतर प्रवाशांनी त्या आरोपीला कह्यात घेऊन रेल्वे पोलिसांना कळवले. पोलिसांनी आरोपीला ठाणे रेल्वेस्थानकात नेले. डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार पविष्ट केली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून अटक केली.
संपादकीय भूमिका :
|