Ramdas Athawale On Love Jihad : (म्हणे) ‘लव्ह जिहाद संकल्पनेशी मी सहमत नाही !’ – रामदास आठवले

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांचे विधान

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले

मुंबई – लव्ह जिहादच्या घटनांना रोखण्यासाठी राज्य शासनाने समिती नियुक्त केली आहे; पण ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी तिला विरोध केला आहे.


शिर्डी येथील माध्यमांशी संवाद साधतांना ते म्हणाले,

‘‘लव्ह जिहाद’ कायद्याला माझा विरोध आहे. हिंदु-मुसलमान मुले-मुली एकत्र येतात आणि लग्नही करतात. त्यामुळे त्याला लव्ह जिहाद म्हणणे चुकीचे आहे. लव्ह जिहाद संकल्पनेशी मी सहमत नाही; मात्र लग्नानंतर धर्मांतर होऊ नये, म्हणून कायद्यात प्रावधान असावे. हिंदु मुलींच्या बळजोरीने करण्यात येणार्‍या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशा प्रकारांना आळा बसला पाहिजे. धर्मांतर करून घेणार्‍यांना कठोर शिक्षा व्हायला हवी.’’

संपादकीय भूमिका

  • एखाद्या वास्तविकतेवर एखादी व्यक्ती सहमत नसेल, तर त्यावरून ती वास्तविकता चुकीची अथवा असत्य ठरत नाही, हे सार्वत्रिक आणि सार्वकालिक सत्य आहे. अर्थात् राजकारणापायी ‘लव्ह जिहाद’च्या वास्तवाकडे डोळेझाक करणार्‍यांना निवडणुकांच्या वेळी हिंदु जनता विसरणार नाही, हेही तितकेच खरे !
  • महाराष्ट्रात लव्ह जिहादवर आळा घालण्यासाठी कायदा होण्याच्या दिशेने निर्णायक पावले उचलली जात असतांना खरेतर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्र्यांनी हा कायदा राष्ट्रव्यापी करून खर्‍या अर्थाने समाजाला न्याय दिला पाहिजे. ते सोडून संकल्पनेला नाकारणे हे उत्तरदायित्व झटकणेच होय, हे लक्षात घेतले पाहिजे.