US Government Jobs Layoff : अमेरिकेतील ट्रम्प सरकारने ९ सहस्र ५०० सरकारी कर्मचार्‍यांना नोकरीवरून काढले !

डॉनल्ड ट्रम्प (उजवीकडे) व त्यांचे सल्लागार इलॉन मस्क (डावीकडे)

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेच्या सरकारने ९ सहस्र ५०० हून अधिक कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले आहे. ट्रम्प यांचे सल्लागार इलॉन मस्क यांनी सरकारी नोकरदार अल्प करण्याची मोहीम हाती घेतली आहे. काढून टाकण्यात आलेल्या कर्मचार्‍यांमध्ये बहुतांश कर्मचारी हे सरकारी भूमीवर चालणार्‍या उद्योगांचे व्यवस्थापन पहाणे आणि माजी सैनिक यांची काळजी घेणे यांसारख्या सेवांशी संबंधित होते. अमेरिकेने यापूर्वीच ७५ सहस्र कर्मचार्‍यांना निवृत्तीचा प्रस्ताव देत कामावरून कमी करण्याची प्रक्रिया चालू केली आहे.

संपादकीय भूमिका

देशहितासाठी कठोर निर्णय कसे घ्यायचे असतात, हे ट्रम्प यांच्याकडून शिकावे !