Power Generation From Waves : देशात प्रथमच मुंबईत समुद्रांच्या लाटांपासून वीजनिर्मिती होणार !

इस्रायलमधील आस्थापनासमवेत कराराची शक्यता


मुंबई – मुंबईत समुद्रांच्या लाटांपासून वीजनिर्मिती केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेले ‘भारत पेट्रोलियम कंपनी लिमिटेड’ (‘बी.पी.सी.एल्.’) आस्थापन हा प्रकल्प चालू करणार आहे. त्यासाठी इस्रायलच्या आस्थापनाचे सहकार्य घेण्यात येईल. समुद्राच्या लाटांपासून वीज निर्मिती हा देशातील प्रायोगिक तत्त्वावर चालू केलेला पहिला प्रकल्प असेल.

१. देहली येथे ‘इंडिया एनर्जी वीक’ कार्यक्रम झाला. त्यात देशातील वाढते इंधन आणि ऊर्जा यांच्या गरजा पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. पर्यावरणास अनुकूल आणि स्वच्छ ऊर्जा निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्यात आले. या अंतर्गत ‘बी.पी.सी.एल्.’ मुंबई महासागरासारख्या समुद्रकिनारी अक्षय ऊर्जा स्रोतांद्वारे वीज निर्मितीचे नियोजन केले आहे.


२. ‘बी.पी.सी.एल्.’ आणि इस्रायलचे ‘इको वेव पॉवर’ आस्थापन यांच्या यासंदभातील करार होणार आहे. मुंबईच्या समुद्रकिनारी १०० किलोवॅट वीजनिर्मितीचा प्रकल्प चालू करण्यात येणार आहे. इस्रायलमध्ये संबंधित आस्थापनाने हा प्रकल्प यशस्वी केला आहे. यासंदर्भातील करारावर या आठवड्यात स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे.