हे जगत् जननी, तारक-मारक दोन्ही रूपे तुझ्याठायी एकवटली

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरातील देवीची मूर्ती पुष्कळच मोहक आहे. देवीला पहातांना माझ्या लक्षात आले, ‘देवीचे गाल आणि शस्त्रे यांवर जी चकाकी आहे, त्यात बाहेरील परिसराचे प्रतिबिंब दिसते.’ हे दृश्य पहातांना मला सुचलेल्या ओळी पुढे दिल्या आहेत.

सौ. स्‍वाती शिंदे

तुझ्यातूनीच प्रसवले विश्व सारे हे जगत् जननी ।
विश्वात सार्‍या व्यापून तूच, तरीही उरली ।। १ ।।

हे जगत् जननी, तारक-मारक दोन्ही रूपे तुझ्याठायी एकवटली ।
जणू भक्तांच्या रक्षणासाठी माय-माऊली प्रगटली ।। २ ।।

कुशीत तुझिया हळूवार येता वात्सल्यभावे थोपटशी ।
स्वभावदोष अन् अहं यांना मात्र पुरेपूर धोपटशी ।। ३ ।।

–  सौ. स्वाती संदीप शिंदे (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.७.२०२३)

_________________________________________________

नित्य मज होवो तयांचे स्मरण ।

‘गुरुचरणांच्या प्राप्तीविना आणखी काही नको’, याविषयी सुचलेल्या ओळी पुढे दिल्या आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

प्राप्ती मज करायची ।
गुरुमाऊलींच्या चरणांची ।। १ ।।

सौ. स्‍वाती शिंदे

भक्ती मज करायची ।
गुरुमाऊलींच्या चरणांची ।। २ ।।

मुक्ती मज मिळवायची ।
गुरुमाऊलींच्या चरणांशी ।। ३ ।।

भक्तीमय होता अंतःकरण ।
त्यात विसावले श्री गुरुचरण ।। ४ ।।

नित्य मज होवो तयांचे स्मरण ।
मुक्त होऊन सुटेल फेरा जन्म-मरण ।। ५ ।।

–  सौ. स्वाती संदीप शिंदे (२७.७.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक