Mahakumbh 2025 : महाकुंभातील संगमावर ९ फेब्रुवारीला १ कोटी ९ लाख भाविकांनी केले स्नान !

संगमस्नानाचा आकडा ४२ कोटींच्या वर !

प्रयागराज, ९ फेब्रुवारी (वार्ता.) – महाकुंभमेळा १३ जानेवारीपासून चालू झाला. महाकुंभात दिवसेंदिवस भाविकांचा ओघ वाढतच आहे. ९ फेब्रुवारी या एकाच दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत एकूण १ कोटी ९ लाख भाविकांनी त्रिवेणी संगम तट आणि इतर घाटांवर स्नान केले आहे. १३ जानेवारी ते ९ फेब्रुवारीपर्यंत एकूण ४२ कोटी भाविकांनी त्रिवणी संगम येथे स्नान केले.