
वॉशिंग्टन – अमेरिकेच्या वाणिज्यमंत्र्यांनी ‘डीपसीक’ हे कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान अमेरिकी तंत्रज्ञांनी बनवले होते, ते चीनने चोरले, असा आरोप केला आहे. ट्रम्प प्रशासनाचे वाणिज्य सचिवपदाचे उमेदवार हॉवर्ड लुटनिक म्हणाले की, चीन केवळ स्वतःचा विचार करतो आणि अमेरिकेला हानी पोचवू इच्छितो. आपण चीनला साहाय्य करणे थांबवले पाहिजे. ‘डीपसीक’मुळे ‘ओपनएआय’, गुगल आणि सिलिकॉन व्हॅलीतील अनेक आस्थापने यांची झोप उडाली आहे. ‘डीपसीक’मुळे कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रात स्पर्धा वाढली आहेच, यासह शेअर बाजारावरही त्याचा परिणाम झाला आहे.
तैवानने ‘डीपसीक’वर घातली बंदी !
तैवानच्या डिजिटल व्यवहार मंत्रालयाने सरकारी कर्मचार्यांना ‘डीपसीक’ वापरण्यास बंदी घातली आहे. ‘डीपसीक’मुळे ‘डेटा लीक’ होण्याची शक्यता असल्याने तैवानने हा निर्णय घेतला आहे.