|
पूर्णिया (बिहार) – येथे हिंदु मुलींना वेश्याव्यवसायात ढकलणार्या एका टोळीतील सदस्यांना पकडण्यात आले आहे. या टोळीचा प्रमुख आफताब असल्याचे सांगितले जाते. ‘अंकित तिवारी’ असल्याचे सांगून आफताब हिंदु मुलींना फसवत होता. त्याचे सहकारी मौसम, शाकिब आणि अन्य हेही अशाच प्रकारे हिंदु नावे धारण करून हिंदु तरुणींना फसवत होते. या टोळीत झुबैदा नावाच्या महिलेचाही समावेश आहे. तिने स्वतःचे नाव कतरिना ठेवले आहे.
🚨 Shocking news from Purnia, Bihar!
🚨 A gang, led by Aftab Khan, has been deceiving Hindu girls by using fake Hindu identities, like ‘Ankit Tiwari’, and even pretending to be a ‘Bajrang Bali’ devotee. – The victims are then forced into prostitution.
32 Arrested – gang leader… pic.twitter.com/uGu1cDxkZN
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 2, 2025
१. पूर्णियातील कटिहार मोड परिसरात टाकण्यात आलेल्या धाडीतून ११ अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली. त्यांना वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले होते. या सर्वांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी ३२ जणांना अटक केली. यामध्ये ६ पुरुष, तर २६ महिला आहेत. आफताब अजूनही पसार आहे.
२. यांतील एका पीडितेने सांगितले की, या टोळीचा प्रमुख आफताब खान आहे. त्याने ‘अंकित तिवारी’ असे नाव ठेवले होते. त्याने ‘थार’ गाडी खरेदी केली होती आणि त्यावर ‘जय बजरंग बली’ लिहिलेले होते. तो स्वतःला कट्टर हिंदु म्हणवून घेत असे. तो हिंदु मुलींना विवाहाचे आमिष दाखवून धमकावत असे आणि नंतर त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत असे.
संपादकीय भूमिका
|