|

मुंबई : अभिनेते सैफ अली खान यांच्यावरील आक्रमणप्रकरणी पोलिसांनी महंमद शरीफुल याला कह्यात घेतले. त्याच्या आधी आकाश कनोजिया (वय ३१ वर्षे) याला कह्यात घेतले होते; पण नंतर तो आरोपी नसल्याचे समजल्यावर पोलिसांनी त्याला सोडून दिले; पण अटक केल्यामुळे त्याची नोकरी गेली. त्याचे ठरलेले लग्न मोडले. यामुळे आमच्या कुटुंबावर संकटाचा डोंगर कोसळला आहे. आता त्याला कुणीही नोकरी देत नाही. या सर्व घटनेचा मुलावर परिणाम झाला आहे. मुंबई पोलिसांनी आरोपीच्या चेहर्याची निश्चिती करायला हवी होती. मुंबई पोलिसांनी त्यांची झालेली ही चूक मान्य करावी, अशी आमची मागणी आहे, असे विधान आकाशच्या वडिलांनी केले आहे.