(वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
अमृतसर (पंजाब) – येथे २६ जानेवारीच्या दिवशी एका तरुणाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा फोडण्याचा प्रयत्न केला. पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी लावलेल्या शिडीवर तरुण चढला. त्याने पुतळ्यावर हातोड्याचे घाव घातले. यात पुतळ्याचा काही भाग तुटला. पुतळ्याजवळ ठेवलेल्या राज्यघटनेच्या प्रतिकृतीचीही त्याने तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. या वेळी लोकांनी तरुणाला पकडून मारहाण केली आणि पोलिसांना माहिती दिली. प्रकाश असे आरोपीचे नाव असून तो धरमकोटचा रहिवासी आहे. या घटनेनंतर येथे तणावपूर्ण वातावरण आहे.