सांगली – जे गीत म्हणत सहस्रो क्रांतीकारक फासावर गेले, ते ‘वन्दे मातरम्’ गीत लिहून त्याला १५० वर्षे पूर्ण झाल्याविषयी येथील विलिंग्डन महाविद्यालय येथे २६ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता १५० कलाकारांना घेऊन ‘जय भारत, वन्दे मारतम्’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परिवर्तन उद्योग संचलित कलास्पर्शद्वारे होणार्या हिंदी आणि मराठी गाण्यांच्या कार्यक्रमासाठी १५० रुपये स्वागतमूल्य ठेवले आहे. हा कार्यक्रम सांगली पोलिसांना समर्पित असून या कार्यक्रमात ‘वन्दे मातरम्’ शब्द असलेली गाणी सादर करण्यात येणार आहेत, तसेच ‘वन्दे मातरम्’चा इतिहास त्यात मांडण्यात येणार आहे. तरी तिकिटासाठी ८२६३९ ७७७४०, ९१७५७ ५६८८५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन परिवर्तन उद्योगच्या संचालिका सौ. कल्याणी गाडगीळ यांनी केले आहे.