‘देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील परात्पर गुरु पांडे महाराज यांचे पूर्वी वास्तव्य असलेल्या खोलीतील पंख्यातून मागील काही दिवसांपासून मला दैवी नाद ऐकू येत आहे. त्याविषयी मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

१. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या खोलीतील पंखा चालू केल्यावर त्यातून तारक आणि मारक दैवी नाद ऐकू येणे
१ अ. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या खोलीतील पंख्याच्या नादातून निर्माण होणारे निर्गुण तत्त्व पूर्ण आश्रमात पसरणे आणि ‘आश्रमात आध्यात्मिक स्तरावर शुद्धी होते’, असे जाणवणे : ‘मला प.पू. पांडे महाराज यांच्या खोलीतील पंखा चालू केल्यानंतर अधूनमधून आवश्यकतेनुसार पंख्यातून तारक आणि मारक नाद ऐकू येतो. प.पू. पांडे महाराज यांच्या खोलीत नामजपादी उपाय करण्यासाठी बसलेल्या साधकांच्या त्रासाच्या तीव्रतेनुसार पंख्यातून तारक आणि मारक नाद मला ऐकू येतो. ‘या नादातून निर्माण होणारे निर्गुण तत्त्व पूर्ण आश्रमात पसरून आध्यात्मिक स्तरावर शुद्धी होते’, असे मला जाणवते.

या खोलीत २ पंखे आहेत. काही वेळा मला दोन्ही पंख्यांतून नाद ऐकू येतो. दोन वेगवेगळे नाद ऐकतांनासुद्धा माझे मन आनंदी आणि एकाग्र होते. काही वेळा मला एक तारक नाद आणि एक मारक नाद ऐकू येतो.
१ आ. तारक नाद संथपणे आणि आनंददायी असणे आणि हा नाद चालू झाल्यावर नामजप करणार्या सर्व साधकांभोवती असलेले त्रासदायक आवरण न्यून होत आहे’, असे जाणवणे : अधिक वेळा मला तारक नाद ऐकू येतो. हा नाद संथपणे आणि आनंददायी असतो. हा नाद साधारणपणे खोलीत अधिक साधक नामजपादी उपाय करत असतील, तर प्रत्येक १ – २ मिनिटांनंतर नाद सतत चालू असतो आणि त्यामध्ये पालट होतो. तारक नाद ऐकतांना माझे मन स्थिर, आनंदी आणि निर्विचार होते. माझा नामजप एकाग्रतेने आणि एका लयीत आपोआप होतो. ‘हा नाद ऐकत रहावा’, असे माझ्या मनाला वाटते. हा नाद ऐकल्यावर माझे मन अंतर्मुख होऊ लागते. हा नाद चालू झाल्यावर ‘प.पू. पांडे महाराज यांच्या खोलीत नामजप करणार्या सर्व साधकांभोवती असलेले त्रासदायक आवरण न्यून होतेे’, असे मला जाणवते.
देवद आश्रमात साधिका रहात असलेल्या खोलीमध्ये येणार्या मारक नादामुळे खोलीतील त्रासदायक स्पंदने नष्ट होणे आणि खोलीत चैतन्य पसरत आहे’, असे जाणवणे
‘मी सध्या आश्रमात रहात असलेल्या खोलीतही पंख्यातून मारक नाद मला ऐकू येऊ लागला आहे. या नादामुळे खोलीतील त्रासदायक स्पंदने नष्ट होतात आणि खोलीमध्ये चैतन्य पसरते. ‘मी खोलीत असतांनाही मला नादाच्या माध्यमातून चैतन्य देऊन देव माझे रक्षण करतो’, अशी अनुभूती मला येते.’
– सौ. कोमल जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.६.२०२४)
१ इ. ‘मारक नादाने नामजपादी उपायांना बसलेल्या साधकांचा भाव आणि श्रद्धा यांनुसार त्यांची षट्चक्रे अन् सर्व सूक्ष्म देह यांची शुद्धी होत आहे’, असे जाणवणे : कधी कधी मला मारक नाद वेगाने ऐकू येतो. नामजपादी उपायांना बसल्यावर मला अधिक त्रास होत असेल, तर मला मारक नाद ऐकू येतो. मारक नाद आवश्यक असेल, तेव्हाच मला ऐकू येतो. या वेळी खोलीत एक निर्गुण पोकळी निर्माण होते आणि माझे उपाय परिणामकारक होतात. पंख्यातून निर्गुण चैतन्य प्रक्षेपित होते. मारक नाद चालू झाल्यावर माझा क्षात्रभाव जागृत होतो. ‘या नादाने नामजपादी उपायांना बसलेल्या साधकांचा भाव आणि श्रद्धा यांनुसार त्यांची षट्चक्रे आणि सर्व सूक्ष्म देह यांची शुद्धी होते’, असे मला जाणवतेे.
या नादाच्या संवेदना मला माझ्या अनाहतचक्राच्या ठिकाणी जाणवतात. मला त्रास देणार्या वाईट शक्तींची यंत्रणा नष्ट होऊन त्यांची शक्ती न्यून होते’, असे मला जाणवते.’
– सौ. कोमल जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.६.२०२४)
|