‘लव्ह जिहाद’विषयी निरीक्षण काढण्याची मुसलमानाने केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
नवी देहली – उत्तरप्रदेशच्या बरेली येथे लव्ह जिहादचे एक प्रकरण समोर आले होते. त्यावर स्थानिक बरेली सत्र न्यायालयाने लव्ह जिहाद्याला शिक्षा सुनावत म्हटले होते की, लव्ह जिहादच्या अंतर्गत धर्मांतराचे सूत्र सहज घेतले जाऊ शकत नाही. बेकायदेशीर धर्मांतर हा देशाची एकता, अखंडता अन् सार्वभौमत्व यांना मोठा धोका आहे. बरेली न्यायालयाने केलेल्या या निरीक्षणांच्या नोंदी काढून टाकण्याची मागणी अनस नावाच्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात एका जनहित याचिकेद्वारे करण्यात आली होती. त्यावर न्यायमूर्ती हृषिकेश राय आणि एस्.व्ही.एन्. भाटी यांच्या खंडपिठाने याचिकाकर्त्याला विचारले की, बरेली न्यायालयाने पुराव्यांच्या आधारे नोंदवलेली निरीक्षणे आम्ही कशी काढून टाकू ? असे सांगत न्यायालयाने याचिका फेटाळली. बरेलीच्या अतिरिक्त सत्र न्यायाधिशांच्या जलदगती न्यायालयाने १ ने ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत या प्रकरणात घेतलेल्या निर्णयात वरील टिप्पणी केली होती.
Bareilly court’s remarks on ‘Love Jihad’ are backed by evidence! – Supreme Court
The Supreme Court dismissed a Mu$l|m petitioner’s plea to expunge observations objecting to the term ‘Love J|h@d.’
Hindus should question pseudo-progressive, secularist, and anti-Hindu Indian… pic.twitter.com/INWWGGdAw3
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 3, 2025
न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, अलीमने पीडितेला खोट्या बहाण्याने तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी हिंदू असल्याचे भासवले. पीडितेला लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडण्यासाठी फसवणुकीचा वापर करणे आणि नंतर तिच्यावर इस्लाममध्ये धर्मांतर करण्यासाठी दबाव आणणे, अशी टिपणी न्यायाधिशांनी केली.
बरेली न्यायालयाने लव्ह जिहादविषयी नोंदवलेल्या महत्त्वपूर्ण नोंदी !१. बरेली न्यायालयाने त्याच्या निकालात संबंधित प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’ चे उदाहरण म्हणून स्पष्टपणे संबोधले. २. अलीम याने केलेले पीडितेचे शोषण हा एका मोठ्या आणि त्रासदायक प्रवृत्तीचा भाग होता. हा केवळ वैयक्तिक फसवणुकीचा विषय नाही, तर धर्माच्या नावाखाली असुरक्षित व्यक्तींना हाताळण्याचा आणि त्यांचे लैंगिक शोषण करण्याचा हा सुनियोजित कट होता. ३. बरेली न्यायालयाने ‘लव्ह जिहाद’च्या घटनेची तुलना पाकिस्तान आणि बांगलादेश येथील परिस्थितीशी केली. या दोन्ही देशांमध्ये बलपूर्वक धर्मांतर करण्याची प्रकरणे मोठ्या प्रमाणात होत आहेत. ४. लव्ह जिहादसारख्या घटनांना आळा घालण्याची आवश्यकता आहे; अन्यथा भारतीय समाजाच्या धर्मनिरपेक्ष रचनेचा र्हास होऊ शकतो. ५. ‘लव्ह जिहाद’सारख्या प्रथा अनियंत्रितपणे चालू ठेवण्यास अनुमती देऊन, आपण भारतात पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्याप्रमाणेच परिस्थिती निर्माण करण्याचा धोका पत्करत आहोत. ६. या दोन्ही देशांमध्ये धार्मिक स्वातंत्र्य अल्प आहे आणि धर्मांतरासाठी महिलांना पद्धतशीरपणे लक्ष्य केले जाते. |
काय आहे प्रकरण ?बरेलीच्या देवरनिया पोलीस ठाण्याच्या परिसरातील हे प्रकरण आहे. शहरातील राजेंद्रनगर येथील एका संस्थेत संगणक प्रशिक्षण घेण्यासाठी रहाणार्या विद्यार्थिनीने तक्रार नोंदवली होती. आरोपी आलिम याने स्वत:ची धार्मिक ओळख लपवत स्वत:ला ‘आनंद’ म्हणवून घेतले आणि विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने तिला एका मंदिरात नेऊन तिच्या कपाळावर सिंदूर भरले आणि विवाह झाल्याचे सांगून तिच्यासमवेत अनेक वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पुढे ती गरोदर राहिली. कालांतराने तिला त्याची खरी ओळख पटली. तेव्हा त्याने तिच्यावर धर्मांतर करण्याचा दबाव आणला. तसेच आलिमने काढलेली तिची अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ प्रसारित करण्याची तिला धमकी देण्यात आली. हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने अंतिम सुनावणी करतांना आलिमला दोषी ठरवून जन्मठेप आणि १० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली होती. यासह त्याच्या वडिलांनी पीडितेला धमकावल्याबद्दल दोषी धरून त्यांना २ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. |
संपादकीय भूमिका
|