मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पंतप्रधानांच्या हत्येच्या कटाविषयीचा संदेश !

पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई – मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा संदेश प्राप्त झाला आहे. संदेश पाठवणार्‍याने प्रिन्स आणि इरफान हे दोघे बाँबस्फोट घडवून आणण्याच्या सिद्धतेत असून एक जण धनबाद, तर दुसरा मुंबईमध्ये बाँबस्फोट घडवणार आहे. हे दोघे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ‘आय.एस्.आय.’साठी काम करत आहेत, अशी माहिती संदेशात दिली आहे. या संदेशाची मुंबई पोलिसांनी गंभीर नोंद घेतली असून संदेश पाठवणार्‍या व्यक्तीचा तातडीने शोध चालू आहे.

संशयित व्यक्ती आस्थापनात बेकायदा शस्त्रनिर्मिती करत आहेत. भारतीय लष्कराला उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्नात ते आहेत, अशीही माहिती संदेशात दिली आहे. या संदेशात इरफानचा भ्रमणभाष क्रमांकही देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची धमकी येणे ही मुंबई पोलिसांना मिळालेली दुसरी घटना आहे.

संपादकीय भूमिका :

वारंवार असे धमकीचे संदेश येणे म्हणजे कायदा-सुव्यवस्थेचा धाक संपल्याचेच लक्षण !