(ग्रेनेड म्हणजे हातबाँब)
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – उत्तरप्रदेशातील देवबंद येथे पोलिसांवर ग्रेनेडद्वारे आक्रमण केल्याच्या प्रकरणातील आरोपी नाझीर अहमद उपाख्य जावेद इक्बाल याला तेव्हा अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला जामीन मिळाल्यानंतर तो पसार झाला होता. (अशांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा मिळण्यासाठीच आता प्रयत्न व्हायला हवेत, तरच अशा घटना थांबतील ! – संपादक) आता त्याला साधारण ३१ वर्षांनंतर श्रीनगर येथून अटक करण्यात आली आहे. ३१ वर्षांपासून नाव, वेशभूषा आणि ठिकाण पालटून तो सर्वांना फसवत असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे त्याने जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीतही भाग घेतला होता. तो आम आदमी पक्षाचा उमेदवार होता.