Sri Lankan Airlines Advertisement on Ramayana : पर्यटनाला चालना देण्यासाठी श्रीलंकेकडून रामायणाचा आधार !

कोलंबो (श्रीलंका) – भारत आणि श्रीलंका यांचे एकमेकांशी नेहमीच जवळचे संबंध होते. यांपैकी रामायण हा एक महत्त्वाच धागा आहे. आता श्रीलंकेच्या एका विमान आस्थापनाने देशाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि भारतियांना आकर्षित करण्यासाठी रामायणाचा आधार घेतला आहे.

१. ‘श्रीलंकन एअरलाइन्स’ने ५ मिनिटांचे एक व्हिडिओ विज्ञापन सिद्ध केले आहे. त्यात रामायण आणि त्याच्याशी संबंधित श्रीलंकेतील सांस्कृतिक वारसा, यांवर भाष्य केले आहे.

२. या व्हिडिओमध्ये एक आजी तिच्या नातवाला रामायणाविषयी सांगत असल्याचे दिसते. यामध्ये ती रामायणात नमूद केलेल्या श्रीलंकेतील ठिकाणांचा संदर्भ देते. या विज्ञापनामध्ये रावणाची गुहा, सीतामातेचे मंदिर आणि इतर प्रमुख पर्यटन स्थळांचे दृश्य दाखवण्यात आले आहे.

३. याखेरीज या व्हिडिओमध्ये भगवान हनुमानाने लंकेतील रावणाच्या राजवाड्याला लावलेली आग, भारत आणि श्रीलंका यांना जोडणारा रामसेतू इत्यादी घटनांचाही उल्लेख आहे.

संपादकीय भूमिका

श्रीलंकेने चीनला साहाय्य करून कितीही भारतविरोधी भूमिका घेतली, तरी अंततः त्याला भारताविना पर्याय नाही, हे त्याने कायम लक्षात ठेवले पाहिजे !