संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा पथकांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी !

तेल अविव – इस्रायलने संयुक्त राष्ट्रांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. प्रथम संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांना इस्रायलमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली होती. आता इस्रायली संसदेने दोन कायदे संमत करून संयुक्त राष्ट्रांना इस्रायलच्या भूमीवर काम करण्यास बंदी घातली आहे. या कायद्यांमध्ये गाझामधील पॅलेस्टिनी शरणार्थींसाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा पथकांना ‘आतंकवादी’ संबोधले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षायंत्रणेचे आयुक्त जनरल फिलिप लाझारीनी म्हणाले की, इस्रायली संसदेने व्यक्त केलेले मत ‘अभूतपूर्व’ आहे. हे एक धोकादायक उदाहरण आहे. लझारीनी यांनी लिहिले आहे की, आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या अंतर्गत इस्रायलच्या दायित्वांचे हे उल्लंघन आहे.