सर्वधर्मसमभावाचे कुसंस्कार !

पुणे येथील महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या कै.सौ. अश्विनी अरुण देवस्थळे पूर्व प्राथमिक इंग्रजी माध्यमाच्या हुजूरपागा शाळेत ‘ईद-ए-मिलाद’चे निमित्त करून लहान मुलांच्या मनामध्ये म्हणे सर्वधर्मसमभाव रुजवण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सविता अनकाईकर यांनी या दिवसाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. शाळेतील छोट्या मुलींनी मुंशी प्रेमचंदलिखित ‘ईदगाह’ ही कथा नाट्यरूपात सादर केली. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणायचे ‘मला परधर्मियांची काळजी नाही, हिंदूंचीच भीती आहे !’ ‘आत्मघात म्हणजे काय ?’ हे या कार्यक्रमामुळे प्रकर्षाने जाणवले.

हुजूरपागा शाळेत दहीहंडी, गणेशोत्सव, गरबा, मकरसंक्रांत, आषाढी एकादशी सण साजरे होतात का ? होत नसतील, तर का नाही होत ? व्हायला हवेत; कारण ती आपली संस्कृती आहे. त्या शाळेत जवळ जवळ सगळ्याच हिंदु मुली आहेत, त्यामुळे हिंदु सण साजरे होणे आवश्यक आहे. जर हे सण साजरे होत असतील, तर त्याचे वृत्त वृत्तपत्रात का येत नाही ? ईद साजरी केली आणि वृत्तपत्रात बातमी का दिली ? नक्की कशाची प्रसिद्धी करायची होती ? कॉन्व्हेन्ट शाळांच्या संदर्भातही हीच गोष्ट लागू होते. मग हिंदु मुलांवर ईद, ख्रिसमस साजरा करण्याची सक्ती का ?  बालभारतीच्या चौथीच्या पुस्तकात ‘ईदगाह’ नावाचा धडा आहे आणि हा धडा विशिष्ट समाजाचे संबोधन करणारा आहे. ते पुस्तक लिहिणारे ‘बोर्ड ऑफ स्टडीज्’, दिशाभूल करून धडा लिहिणारे आणि  तो धडा अभ्यासक्रमात घेणारे कथित सर्वधर्मसमभावाचा पुरस्कार करतात. शालेय पुस्तकात वरून लादलेला बेगडी सर्वधर्मसमभाव शाळेत आदेश बनून येतो, ही व्यावहारिक वस्तूस्थिती आहे. त्यामुळे हिंदु बालमनावर दिशाभूल करणारे संस्कार झाले आहेत, हे नाकारता येत नाही. कधी काळी संस्कार घडवणारी ही शाळा आज मात्र राजकीय रेट्यात, हिंदुत्वावरच घाला घालत आहे. एका असभ्य, हिंस्र, स्त्रीद्वेषी धर्माचा उदो उदो करत मुलींचीही ‘लव्ह जिहाद’च्या दृष्टीने मानसिकता घडवण्याचा प्रयत्न करत आहे. हे इथेच थांबले पाहिजे, अन्यथा शाळेतील शिक्षक मंडळी त्यांच्या सणाला मशिदीमध्ये मुलांना सहलीला घेऊन जातील. उद्या ‘हिजाबची ओळख’ असा कार्यक्रमही ठेवतील ! जर या वयापासून त्या पंथाशी जवळीक होत गेली, तर मुलींना त्याची ओढ वाटेल आणि मग लव्ह जिहाद टाळणे कठीण होऊन बसेल ! तेव्हा हिंदु पालकांनो, सावधान !

– सौ. अपर्णा जगताप, पुणे.