|
मंडी (हिमाचल प्रदेश) – शहरात असलेल्या मशिदीचे अवैधरित्या केलेले बांधकाम पाडण्याचा आदेश मंडी महानगरपालिकेचे आयुक्त एच्.एस्. राणा यांच्या न्यायालयाने १३ सप्टेंबर या दिवशी दिला. मशिदीचे अवैध बांधकाम ३० दिवसांत पाडावे, अन्यथा प्रशासन ते पाडेल, अशी चेतावणी या वेळी न्यायालयाने मशिदीच्या व्यवस्थापनाला दिली. या जागेवर एक मजली मशीद होती, तिथे कोणतीही कारवाई केली जाणार नाही. त्या मशिदीच्या वर कुठलीही अनुमनती न घेता २ मजल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. त्याच बांधकामावर कारवाई होईल. दुसरकडे मुसलमानांनी जेल रस्ता भागात बांधलेली मशिदीची अवैध भिंत पाडण्यास १२ सप्टेंबरपासून आरंभ केला आहे. रस्त्यावरील अतिक्रमण करून बांधलेली भिंत आता मुसलमानच पाडत आहेत.
🚨 Warning from Municipal Court of #HimachalPradesh to Mosque Management!
🎯 Demolish the illegal construction of the mosque ; else, the administration shall demolish it!
📌 30-day deadline given
📌Curfew imposed in the area
📌Police use water cannons to disperse protesting… pic.twitter.com/DYTWMcsbIz
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 13, 2024
मशिदीवर कारवाईसाठी हिंदूंचे आंदोलन !
मशिदीच्या अवैध बांधकामाप्रकरणी महापालिका न्यायालयात सुनावणी चालू असतांना हिंदु संघटना आणि मंडीतील स्थानिक नागरिक ही मशीद पाडण्याच्या मागणीसाठी न्यायालयाच्या बाहेर आंदोलन करत होते. (हिंदूंना अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून अवैध बांधकाम का पाडत नाही ? – संपादक) त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. जून २०२४ पासून महापालिका न्यायालयात हा खटला चालू होता. १२ सप्टेंबरला प्रशासनासमवेत झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर १३ सप्टेंबरला हिंदु संघटनांनी निदर्शने चालू केली. या वेळी हिंदूंनी ‘हिमाचल’ने थाना है, देवभूमी को बचना है’ आणि ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा दिल्या. पोलिसांनी हिंदु आंदोलकांना पांगवण्यासाठी पाण्याच्या फवार्याचा वापर केला. यानंतर झालेल्या गदारोळानंतर उपायुक्तांनी ‘अवैध बांधकाम असलेल्या मशिदीला टाळे ठोकले जाईल’, अशी घोषणा केली. जिल्हा दंडाधिकारी अपूर्व देवगण यांनी सध्या मंडी शहरातील ७ प्रभागांमध्ये भारतीय न्याय संहितेचे कलम १६३ लागू केले आहे.
सरकार कायद्यानुसार कारवाई करेल ! – मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू
मंडीमध्ये अवैध बांधकाम झाले असल्याचे उघड झले आहे. हा वाद सोडवण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल. हिमाचल प्रदेश हे शांतताप्रिय राज्य आहे. येथे सर्व धर्मांचा आदर केला जातो. कोणताही धर्म, जात किंवा पंथ यातून सुटणार नाही. आमचे सरकार कायद्यानुसार कारवाई करेल. अवैध बांधकामांना अनुमती नाही. नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी म्हटले आहे.
संपादकीय भूमिका
|