परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रथोत्सवाच्या वेळी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर (वय १७ वर्षे) हिला आलेल्या अनुभूती

‘२२.५.२०२२ या दिवशी परात्पर गुरुदेवांचा ८० वा वाढदिवस होता. त्या दिवशी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मला गुरुदेवांचे अखंड स्मरण होत होते. गुरुदेवांच्या जन्मोत्सवानिमित्त असलेल्या रथोत्सवात नृत्य करतांना आणि रथोत्सवाचे अनमोल क्षण अनुभवतांना गुरुदेवांच्या अपार कृपेने मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

(भाग १)

१. रथोत्सवाच्या आदल्या दिवशी जाणवलेली सूत्रे

१ अ. साधकांना प्रसंगांतून शिकवून अनुभूती देणारे आणि साधकांची श्रद्धा वाढवणारे कलियुगातील नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१ अ १. रथोत्सवाच्या आदल्या रात्री मुसळधार पाऊस पडत असतांनाही काळजी न वाटता ‘नारायण बघेल’, असे वाटणे : रथोत्सवाच्या आदल्या रात्री (२१.५.२०२२) पुष्कळ पाऊस पडत असल्यामुळे ‘रथोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा’, यासाठी रामनाथी आश्रमातील सर्व संत आणि साधक श्रीमन्नारायणाला प्रत्येक १५ मिनिटांनी आर्ततेने प्रार्थना करत होते. मी, कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे) आणि सौ. सावित्री इचलकरंजीकर (नृत्य अभ्यासिका) नृत्याच्या सरावासाठी अन् अन्य सेवांसाठी रात्री १२.१५ पर्यंत आश्रमात थांबलो होतो. आम्ही आमच्या निवासस्थानी जातांनाही पुष्कळ पाऊस पडत होता. तेव्हा माझ्या मनात विचार आले, ‘कसे होणार ? जन्मोत्सवाची दिंडी निर्विघ्नपणे पार पडेल ना ?’ तेव्हा आतून उत्तर आले ‘तू निश्चिंत रहा ! नारायण आहे ना ?, तू तूझ्या सेवेकडे लक्ष देऊन ती भावपूर्ण कर !’ त्यानंतर माझ्या मनात एकदाही काळजीचे विचार आले नाहीत.

१ अ २. उशिरापर्यंत सेवा केल्यामुळे पुरेशी झोप न होऊनही नारायणाच्या कृपेने दुसर्‍या दिवशी आनंद अन् उत्साह अनुभवणे : काही सेवांमुळे आम्हाला (मी, कु. शर्वरी कानस्कर आणि सौ. सावित्री इचलकरंजीकर यांना) झोपायला रात्रीचे २ वाजले. मी नेहमीप्रमाणे सकाळी ६.३० वाजता उठले; पण मला काहीच त्रास जाणवला नाही. मी आनंदी आणि उत्साही होते.

मी रात्री झोपण्यापूर्वी नारायणाच्या चरणी आर्ततेने प्रार्थना केली होती, ‘हे नारायणा, कलियुगात पृथ्वीतलावर तू परात्पर गुरुदेवांच्या रूपात अवतरला आहेस. ते निद्रा घेतील, त्यातच माझीही निद्रा पूर्ण होऊ दे आणि मला गुरुसेवेसाठी अधिकाधिक वेळ देता येऊ दे !’  ती प्रार्थना नारायणापर्यंत पोचल्यामुळे त्यानेच मला उत्साही आणि आनंदी ठेवले. यातून ‘आपली गुरुसेवेची तळमळ कशी असावी ?’, आणि ‘भगवंताप्रती दृृढ श्रद्धा कशी असावी ?’, हे मला शिकता आले.

२. सकाळी सूर्यनारायणाचे दर्शन झाल्यावर ‘साधकांमध्ये पराकोटीची तळमळ निर्माण व्हावी आणि त्यांचा भाव वाढावा’, यासाठी नारायणाने लीला घडवली’, असे वाटणे

कु. अपाला औंधकर

२२.५.२०२२ या दिवशी सकाळी उठल्यावर सर्वप्रथम मला ‘सूर्यनारायणा’चे दर्शन झाले. तेव्हा मला आतून जाणीव झाली, ‘नारायणाने ‘सर्व निर्विघ्न पार पडणार आहे’, असा संकेत दिला आहे. आमचा भाव वाढून पराकोटीची तळमळ आमच्यामध्ये निर्माण करण्यासाठी नारायणाने ही लीला घडवली. श्रीविष्णूच्या एका स्तुतीत त्याचे वर्णन करतांना म्हटले आहे, ‘दिनकर मध्यकम् नारायणम्’, याचा अर्थ ‘जो सूर्यमंडलाच्या मध्यभागी स्थित आहे’, म्हणजे गुरुदेव सूर्यमंडलाच्या मध्यभागी स्थित असल्याने त्यांना अशक्य असे काहीच नाही. ‘आज वातावरणात जाणवणारा हा आनंद आणि तेज हे सूर्यनारायणाच्या कृपेनेच कार्यरत झाले आहे’, असे वाटून माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली. मला नारायणाच्या या लीलेतील आनंद अनुभवता आला.

३. भावभक्तीच्या सागरात न्हाऊ घालणारे आणि सर्व साधकांना परमानंद देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले !

३ अ. रथारूढ परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा हा सोहळा संपूर्ण ब्रह्मांड पहात असून ‘आनंद अनुभवत आहे’, असे वाटणे : आम्हाला फेरीसाठी आपापल्या जागी जाण्याचा निरोप आल्यावर माझ्या मनाला ‘प्रभु दर्शनाची आस’ लागली होती. आश्रमाच्या सभागृहातून चालत रथासमोर येऊन उभे रहातांना ‘गुरुदेवांचे रथारूढ रूप नेत्रांमध्ये मावतच नव्हते !’, त्यांना किती वेळा पाहिले, तरी दृष्टी पुनःपुन्हा त्यांच्याकडेच वळत होती. ‘श्रीमन्नारायण स्वरूप गुरुदेवांचा हा रथोत्सव केवळ पृथ्वीवरील जीव अनुभवत नसून संपूर्ण ब्रह्मांड हा सोहळा पहात असून आनंद अनुभवत आहे’, असे मला वाटले. मी मनात म्हणाले, ‘हे नारायणा, ‘मला कलियुगातील तुझ्या मंगलमय रथासमोर नृत्य करण्याची संधी मिळाली’, यासाठी कृतज्ञतेचे अश्रू तुझ्या चरणी अर्पण करते.

३ आ. ‘रथोत्सवाच्या वेळी सत्यलोकाचे वातावरण अनुभवणे आणि श्रीविष्णूचा हा आगळावेगळा जन्मोत्सव ‘याची देही, याची डोळा’ पहात आहे’, असे जाणवणे : ‘रथोत्सवाच्या वेळी आम्ही सर्व साधक सत्यलोकात असून श्रीविष्णूचा हा आगळावेगळा जन्मोत्सव ‘याची देही, याची डोळा’ पहात आहोत’, असे मला जाणवत होते. एक क्षण मला वाटले, ‘मी अयोध्येची रहिवासी असून श्रीरामाच्या दर्शनास आतुर झाले आहे.’ नंतर ‘साक्षात् पांडुरंग माझ्यामागे उभा असून मी त्याच्या नामात रंगून गेले आहे’, अशी भावस्थिती मी अनुभवली.’

(क्रमशः)

– कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (४.६.२०२२)

भाग २. वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/829291.html

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक