नाशिक – येथील इंदिरानगर प्रभागात ‘डे केअर सेंटर शाळे’ने विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी ‘वारली पेंटिंग चित्रकला कार्यशाळे’चे आयोजन केले होते. या कार्यशाळेसाठी कला शिक्षिका सौ. वैष्णवी कुलदीप शिरपूरकर यांना विशेष अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी उपस्थित सर्वजणांना ‘वारली पेंटिंग’च्या मूलभूत तंत्रांपासून ते जटील नमुन्यांविषयीचे सखोल प्रशिक्षण दिले. या कार्यशाळेमुळे विद्यार्थी आणि पालक यांना आदिवासी कलाप्रकाराविषयी माहिती समजली, तसेच स्वतःच्या कलात्मक कौशल्यांचा विकास करण्याची संधी मिळाली. सौ. वैष्णवी कुलदीप शिरपूरकर या नाशिक येथील ‘सनातन प्रभात’चे वाचक डॉ. कुलदीप शिरपूरकर यांच्या पत्नी आहेत.