Mirzapur (UP) Illegal Church : वन विभागाच्या भूमीवर बांधण्यात आलेले अनधिकृत चर्च प्रशासनाने पाडले !

  • मिर्झापूर (उत्तरप्रदेश) येथील घटना

  • चर्चमधून आदिवासींचे आमीष दाखवून करण्यात येत होते धर्मांतर !

मिर्झापूर (उत्तरप्रदेश) – मिर्झापूर जिल्ह्यात सरकारी भूमीवर बेकायदेशीरपणे बांधलेल्या चर्चवर प्रशासनाने बुलडोझर चालवला आहे. येथे धर्मांतर करण्यात येत असल्याच्या तक्रारी येत होत्या. विनोद आणि रमाकांत नावाच्या लोकांवर चर्च बांधल्याचा आरोप आहे. या दोघांनाही या प्रकरणी खटला प्रविष्ट (दाखल) झाल्यानंतर न्यायालयात त्यांची बाजू मांडण्यासाठी बोलावण्यात आले होते; पण दोघेही उपस्थित राहिले नाहीत. अखेर आवश्यक कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर ११ ऑगस्ट या दिवशी या बेकायदेशीर चर्चवर बुलडोझर चालवण्यात आला.

येथील चुनार वनपरिक्षेत्रात हे चर्च बांधण्यात आले. हे ८ वर्षे जुने बांधकाम वन विभागाच्या भूमीवर करण्यात आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. शहरापासून दूर जंगलात रहाणार्‍या आदिवासींचे या चर्चच्या माध्यमातून धर्मांतर करण्यासाठी त्यांना आमीष दाखवले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

संपादकीय भूमिका 

वन विभागाच्या भूमीवर अनधिकृतपणे चर्च बांधण्यात येत असतांना त्याची माहिती वनाधिकार्‍यांना मिळाली नव्हती कि त्यांनी आर्थिक साटेलोटे झाल्याने त्याकडे दुर्लक्ष केले होते ? याचाही शोध घेतला पाहिजे !