विजय सूर्य मंदिराला मशीद ठरवल्याचे प्रकरण
विदिशा (मध्यप्रदेश) – येथील विजय सूर्य मंदिराच्या ठिकाणी नागपंचमीच्या वेळी हिंदूंना पूजा करण्याची अनुमती नाकारणारे जिल्हाधिकारी बुद्धेश कुमार वैद्य यांचे स्थानांतर करण्यात आले आहे. हे मंदिर पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या नियंत्रणात आहे. त्याने ‘त्याने हे मंदिर नसून बिजमंडल मशीद आहे’, असे सांगितल्यावर जिल्हाधिकार्यांनी हिंदूंना पूजा करण्याची अनुमती नाकारली होती.
संपादकीय भूमिकाराज्य सरकारने कारवाई केली, हे चांगले झाले. आता केंद्र सरकारनेही कारवाई करत मंदिराला मशीद ठरवणार्या पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकार्यांवरही कारवाई केली पाहिजे ! |