Kanwar Yatra Attack : झारखंडमध्‍ये रेल्‍वेगाडीद्वारे प्रवास करणार्‍या कावड यात्रेकरूंवर  मुसलमानांकडून आक्रमण !

रांची-लोहारदगा रेल्‍वेगाडीवर दगडफेक

रांची – झारखंडमध्‍ये भगवान भोलेनाथला जलाभिषेक करून परतणार्‍या कावड यात्रेकरूंवर मुसलमानांनी आक्रमण केले. यात्रेकरू प्रवास करत असलेल्‍या रांची-लोहारदगा रेल्‍वेगाडीवर दगडफेक करण्‍यात आली. मुसलमानांनी रेल्‍वेगाडीत लूटमार केल्‍याचाही आरोप आहे. या प्रकरणी कावड यात्रेकरूंनी निदर्शने केली.

१. लोहारदगा जिल्‍ह्यातील कावड यात्रेकरूंचा एक गट राजधानी रांची येथील पहाडी महादेव मंदिरात जलाभिषेक करण्‍यासाठी गेला होता. हे सर्व कावड यात्रेकरू रांची-लोहारदगा रेल्‍वेगाडीने परतत होते.

२. काही मुसलमान प्रवाशांनी त्‍यांच्‍याशी भांडण उकरून काढून त्‍यांना मारहाण केली आणि त्‍यांच्‍या वस्‍तूही लुटल्‍या.

३. या रेल्‍वेमार्गावरील अनेक स्‍थानकांवर मुसलमानांचे आक्रमण चालूच होते. कावड यात्रेकरूंनी भरलेल्‍या या रेल्‍वेगाडीवर दगडफेकही करण्‍यात आली.

४. झारखंडचे भाजपचे प्रमुख आणि राज्‍याचे माजी मुख्‍यमंत्री बाबुलाल मरांडी यांनी या प्रकरणी कारवाई करण्‍याचे पोलिसांना आवाहन केले आहे.

५. ‘पवित्र श्रावण महिन्‍यात शिवभक्‍तांवर झालेले हे आक्रमण निंदनीय आणि अक्षम्‍य आहे’, असे श्री. मरांडी यांनी म्‍हटले आहे.

संपादकीय भूमिका 

  • उत्तर भारतात श्रावण महिना चालू असून येणार्‍या काळात कावड यात्रेकरूंवर मुसलमानांनी आक्रमणे केल्‍याची अशी अनेक वृत्ते समोर आल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही !
  • भारतात हिंदूंच्‍या सण-उत्‍सवांच्‍या काळात त्‍यांच्‍यावर आक्रमण करून त्‍यांच्‍या आनंदावर विरजण घालण्‍याचा मुसलमानांनी कट रचला आहे. हे पोलीस, प्रशासन आणि हिंदू यांना लज्‍जास्‍पद आहे !