Sri Lanka Cyber Scam : श्रीलंकेत ऑनलाईन आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी ६० भारतियांना अटक

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेच्या गुन्हे अन्वेषण विभागाने ऑनलाईन आर्थिक घोटाळ्यांमध्ये सहभागी असलेल्या एका गटातील ६० भारतीय नागरिकांना माडीवेला, बत्तारामुल्ला आणि नेगोंबो येथून अटक करण्यात आली. याविषयी वरिष्ठ पोलीस अधीक्षक निहाल थलदुवा यांनी सांगितले की, गुन्हे अन्वेषण विभागाने वरील भागांत धाडी घालून ६० जणांना अटक केली. त्यांच्याकडून १३५ भ्रमणभाष संच आणि ५७ लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.