Acharya Marathe College Burkha Ban:हिजाब आणि बुरखाबंदी हटवण्यासाठी मुसलमानांचा दबाव !

  • चेंबूर (मुंबई) येथील आचार्य मराठे महाविद्यालयातील प्रकार !

  • बंदी न हटवण्यावर महाविद्यालय ठाम !

मुंबई – चेंबूर येथील आचार्य मराठे महाविद्यालयाच्या प्रशासनाने वर्ष २०२३ मध्ये हिजाब आणि बुरखा यांवर बंदी घातली होती. येत्या शैक्षणिक वर्षात ही बंदी उठवावी, यासाठी काही दिवसांपासून मुसलमानांकडून महाविद्यालय प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रकार चालू आहे. याविषयी काही मुसलमान विद्यार्थिनींनी राष्ट्रीय आणि राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रारही केली आहे. महाविद्यालयाच्या प्रशासनाने मात्र या दबावाला बळी न पडता येत्या शैक्षणिक वर्षातही हिजाब आणि बुरखा यांवरील बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑगस्ट २०२३ मध्ये आचार्य मराठे महाविद्यालयाच्या परिसरात हिजाब आणि बुरखा परिधान करण्यावर बंदी घालण्यात आली होती. हा धार्मिक स्वातंत्र्यावर घाला असल्याची ओरड करत मुसलमान समाजातील काही घटकांनी याला विरोध केला होता. यावर्षी पोषाखाविषयी प्रसारित केलेल्या सूचनेमध्येही महाविद्यालयाच्या प्रशासनाने बुरखा, निकाब, हिजाब, बिल्ला, टोपी यांसारखा धर्माशी निगडीत पोषाख परिधान करण्यावर बंदी असल्याचे नमूद केले आहे. यावरून १३ मे या दिवशी ३० विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाला निवेदन देऊन पोषाखाच्या नियमावली रहित करण्याची मागणी केली.

संपादकीय भूमिका

शिक्षण घेतांना धार्मिक ओळख जपणार्‍यांविषयी तथाकथित निधर्मी टोळी गप्प का ?