दोन दिवसांपूर्वी ‘एम्.आय.एम्.’चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी एका प्रचारसभेत म्हणाले, ‘‘टिपू सुलतान हिंदूंचा द्वेष करत नव्हता, तर ते स्वतः ‘राम’ लिहिलेली अंगठी बोटात घालत असे.’’ हे झाले अर्ध सत्य की, जे उथळ असून हिंदूना मूर्ख बनवण्यासाठी तसे म्हटले आहे. आता पूर्ण सत्य जाणून घेऊ.
१. हैदर अलीने मैसूरच्या हिंदु राजाचे बोट कापून ‘राम’ लिहिलेली सोन्याची अंगठी घेणे आणि त्यावर राजाने शाप देणे
घराणेशाही असलेल्या साम्यवादी इतिहासकारांनी ‘टिपू सुलतान ‘राम’ लिहिलेली अंगठी घालत असे’, हे सांगून त्याला ‘सेक्युलर’ (निधर्मी) असण्याचा किंवा आपल्या माथी मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला; पण हे धादांत खोटे आहे. हैदर अलीने मैैसूरच्या हिंदु राजाची हत्या केली आणि त्यांचे बोट कापून त्यावर ‘राम’ लिहिलेली ४१ ग्रॅम सोन्याची अंगठी काढून घेतली. असे म्हटले जाते की, मैसूरच्या हिंदु राजाने त्याच क्षणी हैदर अलीला शाप दिला होता, ‘तुझा ही अंत एक दिवस असाच होईल.’
२. हैदर अली आणि टिपू सुलतान याने ‘राम’ नामाची अंगठी न घालणे
हैदर अलीने मैसूरच्या राजाचे शब्द ऐकले होते आणि हैदर अलीचा असा विश्वास होता की, मृत्यूच्या वेळी दिलेल्या शापाचा नक्कीच परिणाम होतो. म्हणून हैदर अलीने त्याच्या संपूर्ण आयुष्यात त्याने ही अंगठी कधीच घातली नाही. नंतर त्याने ही अंगठी त्याचा मुलगा टिपू सुलतानला दिली आणि त्यानेही ती अंगठी घातली नाही; कारण हैदर अलीने त्याला ही घटना सांगितली होती.
३. इंग्रजांनी टिपूला मैसूरच्या राजाप्रमाणे ठार मारून त्याच्याकडून बोट कापून अंगठी काढून घेणे
पुढे श्रीरंगपट्टमच्या युद्धाला जातांना टिपूने ही अंगठी घातली. खरेतर टिपू सुलतानच्या एका मंत्र्याने त्याला हे पटवून दिले की, ‘ज्याच्याकडे ही अंगठी असेल, तोच या युद्धात विजयी होईल.’ त्यानंतर श्रीरंगपट्टमच्या लढाईत टिपूविषयी नेमके तेच घडले, जे त्याचे वडील हैदर अली याने मैसूरच्या राजाशी केले होते. इंग्रजांनी टिपूला ठार मारले आणि त्याचे बोट कापून ही अंगठी काढून घेतली. नंतर ‘निलामी हाऊस क्रिस्टीज’ने या अंगठीचा लिलाव केला आणि मैसूरच्या राजाच्या वंशजांनी ही अंगठी विकत घेतली अन् अनुमाने १०० हून अधिक वर्षांनी ही अंगठी मूळ मालकाकडे परत आली.
४. तात्पर्य
तात्पर्य एवढेच की, साम्यवादी लेखकांनी इतिहासात अशा पुष्कळ चुका जाणूनबुजून केल्या आहेत केवळ मोगलांना श्रेष्ठ दाखवण्यासाठी ! जर कुणी मोगलांचे कौतुक करत असेल, तर लगेच त्यावर विश्वास ठेवू नका; कारण त्यामागची सत्य परिस्थिती वेगळीच असते !
(जयसिंग मोहन यांचे फेसबुक)