Army Retired Terriorist : सैन्यातून निवृत्त झाल्यावर आतंकवादी बनलेल्या रियाज याला अटक

नवी देहली – भारतीय सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर आतंकवादी बनलेल्या रियाज अहमद राथर याला देहली पोलिसांनी अटक केली. रियाज जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा येथील रहाणारा आहे. तो ‘लष्कर-ए-तोयबा’साठी कारवाया करत होता.

पाकिस्तानमधून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा मिळवण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यात त्याला खुर्शीद अहमद राथर आणि गुलाम सरवार राथर यांनी साथ दिल्याचे पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले. रियाज आणि त्याचा मित्र अल्ताफ हे ३१ जानेवारी २०२३ या दिवशीच भारतीय सैन्यातून निवृत्त झाले. रियाज हवालदार पदावर कार्यरत होता.

सौजन्य : रिपब्लिक वर्ल्ड 

संपादकीय भूमिका 

सैन्यात असतांना त्याने आतंकवादी संघटनेला काय साहाय्य केले ? याचीही चौकशी केली पाहिजे !