समाज आणि राष्ट्र यांसाठी प्रत्येकाने निःस्वार्थीपणे आणि कर्तव्यबुद्धीने काम करणे आवश्यक असणे !
आज आपण अनेक हुतात्म्यांच्या आत्मबलीदानाच्या पुण्याची फळे स्वातंत्र्याच्या रूपात भोगत आहोत. ‘पुढची पिढी पारतंत्र्यात अडकून पिचू नये’, अशी इच्छा असल्यास प्रत्येकाने समाज आणि राष्ट्र यांसाठी निःस्वार्थीपणे आणि कर्तव्यबुद्धीने थोडे तरी काम केलेच पाहिजे.’
– (कै.) सद्गुरु (डॉ.) वसंत आठवले (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे ज्येष्ठ बंधू)
राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती या महान कार्यासाठी हिंदूंच्या त्यागाची आवश्यकता आहे !
‘तरुणांना एकत्र आणा आणि संघटित करा ! महान त्यागानेच महान कार्य संभव आहे. माझ्या वीर, श्रेष्ठ, उदात्त बंधूंनो, आपले खांदे कार्यचक्राला लावून टाका. कार्यचक्राला जोडून घ्या. थांबू नका. मागे पाहू नका. ना नावासाठी ना यशासाठी, वैयक्तिक अहंकार फेकून द्या आणि सातत्याने कार्य करा !’
– स्वामी विवेकानंद (मासिक ‘पाथेय कण’)
देशाचे भाग्य हे समाज आणि जनता यांवर अवलंबून असते !
देशाचे भाग्य हे त्याच्या जनतेवर अवलंबून असते. समाजाची शक्ती, त्याची प्रेरणा, संकल्प, चारित्र्य आणि अजिंक्यतेचे प्रमाण जेवढे अधिक, तेवढा त्याचा शासक सत्त्वशील, चारित्र्यवान, सेवाभावी, सत्तानिरपेक्ष आणि राष्ट्रसापेक्ष असेल. समाज आणि लोक दुर्बल झाले, तर शासकही अनैतिक, भ्रष्ट आणि स्वैराचारी होऊ शकतात, हे लक्षात घ्या ! – गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर
राष्ट्रास गतवैभव मिळवून देण्याचे कार्य तुम्हाला आणि तुम्हालाच करायचे आहे !
‘राष्ट्रास त्याचे पूर्वीचे गौरवाचे स्थान प्राप्त करून देणे, ही आपली पोकळ घोषणा नाही. आपल्या राष्ट्रास गतवैभव मिळवून देण्यासाठी तुमच्याविना दुसरे कोण सर्वस्वाचा त्याग करून सातत्याने पुरुषार्थ गाजवू शकेल ? भारताच्या भाग्य-लक्ष्मीस प्रसन्नता देणारे तुमच्या व्यतिरिक्त अन्य कोण असू शकेल ? हे कार्य तुम्हाला आणि तुम्हालाच करायचे आहे.’ – डॉ. हेडगेवार
आध्यात्मिकतेचा वारसा असेपर्यंत जगातील कोणत्याही शक्तीला भारताचा विनाश करणे अशक्य !
‘भारताचा आत्मा म्हणजे धर्म आहे. आध्यात्मिकता आहे म्हणूनच भारताचे पुनरुत्थानसुद्धा धर्माद्वारेच होईल. भारताचे प्राण धर्मातच सामावले आहेत. हिंदु लोक जोपर्यंत आपल्या पूर्वजांचा महान वारसा विसरत नाहीत, तोपर्यंत या जगातील कोणतीही शक्ती त्यांचा विनाश करू शकत नाही. जोपर्यंत शरिरातील रक्त शुद्ध आणि शक्तीसंपन्न आहे, तोपर्यंत त्या देहात कुठल्याही रोगाचे जंतू जिवंत राहू शकत नाहीत. आपले जीवनरक्त म्हणजे आध्यात्मिकता होय. जर ते आपल्या अंगातून स्पष्टपणे, जोरदार, शुद्ध आणि बलसंपन्न असे वहात असेल, तर सर्वकाही सुरळीत होईल. जर ते रक्त शुद्ध असेल, तर राजकीय, सामाजिक आणि अन्य भौतिक दोष अगदी या भूमीची गरिबीसुद्धा सर्व काही सुधारले जाईल.’ – श्री. राजाभाऊ जोशी (मासिक ‘लोकजागर’)
संपादकीय भूमिका
|