सनातन धर्माविषयी अवमानकारक विधाने (हेट स्पीच) करणार्‍यांच्या विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांत तक्रारी प्रविष्ट !

राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी नागरिकांनी पोलीस अधिकार्‍यांना दिले निवेदन

सिंधुदुर्ग : ‘सनातन धर्मा’ची डेंग्यू, मलेरिया, कोरोना, एड्स, कुष्ठरोग आदी रोगांशी तुलना करून ‘सनातन धर्मा’ला नष्ट करण्याची भाषा करणारे उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खर्गे, ए. राजा यांच्यासह त्यांच्या विचारांचे समर्थन करणारे पत्रकार निखिल वागळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर सनातन धर्माविषयी अवमानकारक विधाने (हेट स्पीच) केल्याविषयी भारतीय दंड संहितेनुसार आणि ‘आय.टी. ॲक्ट’ अंतर्गत तात्काळ गुन्हे नोंद करावेत अन् त्यांना अटक करावी. सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि सनातन धर्म नष्ट करण्याविषयी ‘हेटस्पीच’ करणार्‍यांच्या विरोधात तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलीस ठाण्यांत देण्यात आले. या वेळी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, विविध क्षेत्रांतील मान्यवर, तसेच सनातन संस्थेचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्यासह राष्ट्रप्रेमी अन् धर्मप्रेमी उपस्थित होते.

वेंगुर्ला – येथे अधिवक्त्या सुषमा प्रभुखानोलकर, सर्वश्री गोपाळ जुवलेकर, विजय रेडकर, सावळाराम नाईक, प्रताप गावस्कर, नरेंद्र मांजरेकर, महेश बागायतकर, भिकाजी केरकर, महेश जुवलेकर, नंदा मांजरेकर, प्रवीण कांदळकर आदींनी वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना निवेदन दिले.

कुडाळ – सर्वश्री रमेश राणे, पद्मनाभ परब (माजी सैनिक, कीर्तनकार), विष्णु खोबरेकर (जिल्हा सहमंत्री, विश्व हिंदु परिषद, कुडाळ), सचिन गावडे (सरपंच, माड्याची वाडी), विवेक पंडित (विवेकानंद क्लासेस आणि शिवप्रेमी संघटना, सिंधुदुर्ग), सतीश डिंगे-सामंत (व्यावसायिक, कुडाळ), सौ. मनाली सोनार, श्रीकृष्ण शिरोडकर (बांधकाम व्यावसायिक) यांच्या उपस्थितीत कुडाळ पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार श्रीमती एस्.एस्. पाडगावकर यांनी निवेदन स्वीकारले.

मालवण येथे अधिवक्ता पलाश चव्हाण, अधिवक्ता गिरिश गिरकर, अधिवक्ता हेमंत गोवेकर, अधिवक्ता समीर गवाणकर, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांना निवेदन देताना पंकज नेरकर, मधुसुदन सारंग, सिद्धेश परब यांच्यासह अन्य अधिवक्ते आणि धर्माभिमानी 

मालवण – अधिवक्ता समीर गवाणकर, अधिवक्ता हेमंत गोवेकर, अधिवक्ता दिलीप ठाकूर, अधिवक्ता हर्षद तरवडकर, अधिवक्ता गिरिश गिरकर, अधिवक्ता प्रवीण मिठबांवकर, अधिवक्ता पलाश चव्हाण, सर्वश्री मधुसुदन तुकाराम सारंग, सिद्धेश विनायक परब, पंकज बाळा नेरकर, रत्नाकर कोळंबकर, दीनानाथ गावडे, कालीप्रसाद सारंग, भिकाजी दुदवडकर, शिवाजी देसाई, श्रीधर काळे, दशरथ कवठकर, अशोक ओटवणेकर, राजन सकपाळ, अनिकेत फाटक आणि अन्य धर्माभिमानी यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक प्रवीण अशोक कोल्हे यांना निवेदन देण्यात आले.

दोडामार्ग – सर्वश्री सदानंद देसाई, साईनाथ डुबळे, सुनील नांगरे, प्रवीण पवार, रवींद्र तळणकर, प्रवीण रेडकर, सौ. श्रुती डुबळे, चंद्रकांत नाईक, ‘भारतमाता की जय संघटने’चे प्रसन्न पांगम, बजरंग दलाचे निश्चल परमेकर, सरपंच सौ. श्रुती देसाई यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक अरुण पवार यांना निवेदन देण्यात आले.

बांदा – अधिवक्त्या (सौ.) लिना धुरी, सौ. सुनीता मुळ्ये, सर्वश्री नीलेश सावंत, हेमंत दाभोलकर, मंदार केसरकर, मनोहर देसाई, अविनाश देसाई, युवराज हरमलकर, सखाराम शेर्लेकर, गजानन मालोंडकर, शिवराम देसाई, माजी सैनिक नीलेश सावंत यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक श्यामराव काळे यांना निवेदन देण्यात आले.

सावंतवाडी – येथे पोलीस उपनिरीक्षक गजानन भालेराव यांना धर्मप्रेमी सर्वश्री सहदेव राऊळ, वीरेश ठाकूर, अधिवक्ता वैभव चव्हाण, अंकुश गवस, सुशांत भागवत, महेश झारापकर, कु. वनिता काळे, कु. यशश्री टोपले आदींनी निवेदन दिले.

देवगड – येथे पोलीस उपनिरीक्षक सुधीर कदम यांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्री. संजय गणपत तारकर, श्री. वैभव करंगुटकर, सौ. प्रियंका साळसकर, श्री. विशाल मांजरेकर, श्री. योगेश पाटकर (शहराध्यक्ष, देवगड-जामसंडे, भाजप), सर्वश्री रमेश बाक्रे, दत्तात्रय जोशी, अंकुश शेटगे, अभिराम देसाई, गणपत घाडी, विजय पवार, भास्कर खाडीलकर, संजय कोळमकर, सौ. अनघा चोपडेकर, श्रीमती वैशाली हडकर आदी उपस्थित होते.