|
बोकारो (झारखंड) – नववी इयत्तेत शिकणार्या एका हिंदु विद्यार्थ्याने हातात धार्मिक दोरा बांधल्याने येथील कार्मेल कॉन्वेंट शाळेतील शिक्षकाने मुलाला मारहाण करून तो दोरा कापण्यास त्याला भाग पाडले. अमित लकडा असे या शिक्षकाचे नाव असून त्यांनी विद्यार्थ्यावर एवढा दबाव आणला की, मुलाला ब्लेडने दोरा कापावा लागला. ‘हा दोरा म्हणजे आमचे धार्मिक प्रतीक आहे’, असे पीडित विद्यार्थ्याने लकडा यांना सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र लकडा यांनी काहीएक ऐकून न घेता त्याला मारहाण केली.
Jharkhand: Missionary school teacher thrashes student for refusing to remove his Kalawa, pressurises him to chop it off, Hindu outfits protesthttps://t.co/z8JZEsyVq9
— OpIndia.com (@OpIndia_com) July 20, 2023
ही घटना १८ जुलै या दिवशीची असून भाजप आणि स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी या घटनेवर गंभीर आक्षेप घेऊन आरोपी शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शाळेच्या प्राचार्या सिस्टर जायस कुल्लू यांनी शिक्षकावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. बोकारो येथील पोलीस उपायुक्त आणि वरिष्ठ जिल्हाधिकारी यांच्याकडेही हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली आहे. त्यांनी या प्रकरणाचे अन्वेषण करून पुढील कारवाई करण्याचे आश्वासनही दिले आहे.
संपादकीय भूमिका
|