‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणाचे चुकीचे चित्रण प्रदर्शित केलेल्या ‘सोनी टीव्ही’च्या विरोधाचे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त केलेले अनुभवकथन
‘सोनी टीव्ही’वरील एक प्रसिद्ध मालिका आहे, जी आपल्यापैकी अनेकांनी पाहिली असेल, ती म्हणजे ‘क्राईम पॅट्रोल’ ! या मालिकेत देशभरात घडलेले गुन्हे आणि पोलिसांनी या गुन्ह्यांचे अन्वेषण कसे केले ?, गुन्हेगारांना कसे शोधून काढले ? आदी प्रसंग अगदी सविस्तरपणे नाट्यस्वरूपात चित्रित करून दाखवले जातात. डिसेंबर २०२२ मध्ये ‘क्राईम पेट्रोल २.०’ अशी मालिका चालू होती. या मालिकेचा एक भाग ३० डिसेंबर २०२२ या दिवशी प्रदर्शित झाला. त्याचा विषय होता देशभरात सर्वाधिक गाजलेल्या हत्या प्रकरणाचा, म्हणजेच ‘श्रद्धा वालकर हत्या प्रकरणा’चा ! या मालिकेचा हा २१२ वा भाग पाहून देशभरात संतापाची लाट उसळली. या भागामध्ये अतिशय तपशिलांची मोडतोड करण्यात आली होती.
१. ‘सोनी टीव्ही’ने लव्ह जिहाद प्रकरणाच्या एका भागात केलेला खोटारडेपणा
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ‘ही घटना देशभरात ‘लव्ह जिहाद’चे गंभीर प्रकरण म्हणून समोर आले होते’, याचा काहीच उल्लेख या भागामध्ये दाखवण्यात आला नाही. याउलट श्रद्धा वालकर हिचे नावे पालटून एना फर्नांडिस असे एका ख्रिस्ती मुलीचे, तर लव्ह जिहादी क्रूरकर्मा नराधम आफताबचे नाव पालटून ‘मिहीर’ असे हिंदु मुलाचे पात्र दाखवण्यात आले. त्यामुळे ‘ज्या श्रद्धा वालकरचे लव्ह जिहादी आफताबने ३५ तुकडे केले’, ते या भागात ‘एना फर्नांडिसचे या ख्रिस्ती मुलीचे मिहीर या हिंदु मुलाने ३५ तुकडे केले’, असे दाखवण्यात आले. यातून लव्ह जिहादी आणि खूनी मुसलमान असतांनाही त्याला हिंदु नाव देऊन हिंदूंना गुन्हेगार दाखवण्यात आले, तसेच हिंदु युवतीवर झालेला अत्याचार हा ख्रिस्ती नाव दिल्याने तो ख्रिस्त्यांवरील अत्याचार असे दाखवण्यात आले. इतका खोटारडेपणा ‘सोनी टीव्ही’ने केला. अशा मालिका पहाणारा सर्वसाधारण समाज हा प्रत्यक्षात गुन्हेगार कोण होता आणि मालिकेतील नाव काय होते ? हे पहात नाही किंवा तसे त्याला कळतही नाही. समाजमनावर मालिकेत जे दाखवले जाते, तेच चित्र कायम रहाते.
२. ‘सोनी टीव्ही’च्या कर्मचार्यांनी हिंदुत्वनिष्ठांना उडवाउडवीची उत्तरे देणे
इतका भयंकर खोटारडेपणा कशासाठी, तर लव्ह जिहादला लपवण्यासाठी ? मुसलमानांविषयी चुकीची प्रतिमा निर्माण होऊ नये यासाठी ? कशासाठी ? जे आहे ते सत्य का दाखवले गेले नाही ? अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि समाजातील अनेक नागरिक यांच्याकडून हिंदु जनजागृती समितीला ‘आपण याविरोधात काहीतरी करायला हवे’, असे भ्रमणभाष येऊ लागले. त्यामुळे आम्ही या घटनेविषयी विचारणा करण्यासाठी २ जानेवारी २०२३ या दिवशी देहलीतील गुरुग्राम येथील सायबर सिटीमध्ये असलेल्या ‘सोनी पिक्चर नेटवर्क’च्या कार्यालयात प्रत्यक्ष गेलो. त्या वेळी माझ्यासोबत गुरुग्राम येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. संजय चोपडा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. वैद्यनाथन हेही होते. आम्हाला त्यांना निषेधाचे पत्र द्यायचे होते; मात्र सोनी टीव्हीच्या कार्यालयातील अधिकार्यांनी भेट देण्यास नकार दिला आणि ‘हे आमचे ‘सेल्स विभागा’चे (विक्री विभागाचे) कार्यालय आहे’, ‘आमचे लीगल टीमचे (कायदेविषयक विभागाचे) अधिकारी उपलब्ध नाहीत’, ‘तुम्ही तुमचे पत्र मुंबईतील कार्यालयात नेऊन द्या’, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली.
३. सामाजिक माध्यमांद्वारे ‘सोनी टीव्ही’ला विरोध झाल्यावर त्यांनी क्षमा मागणे
यानंतर आम्ही बाहेर आलो, त्यांच्या कार्यालयाच्या फलकासमोरच आम्ही एक व्हिडिओ रेकॉर्ड (ध्वनीचित्रीकरण) केला. त्यामध्ये ‘सोनी टीव्हीचे अधिकारी आणि कर्मचारी हिंदुत्वनिष्ठांच्या निषेधाची नोंद न घेता उडवाउडवीची उत्तरे कशी देत आहेत ?’, हे सांगितले आणि तो व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित केला. त्याच दिवशी हिंदु जनजागृती समितीने ‘बॉयकॉट सोनी टीव्ही’ (#BoycottSonyTV) हा ‘हॅशटॅग’ वापरून सामाजिक माध्यमांवर मोहिम चालवली. या मोहिमेला पुष्कळ मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. त्यामुळे अवघ्या ३० मिनिटांतच सोनी टीव्हीच्या कार्यालयातून आम्हाला भ्रमणभाष आला आणि त्यांनी आम्हाला विनंती केली, ‘तुम्ही या, आम्ही तुमचे निवेदन स्वीकारायला सिद्ध आहोत.’ मग आम्ही त्यांना सांगितले, ‘आता आम्ही येणार नाही. तुम्ही समस्त हिंदु समाजाची क्षमा मागा. जोवर तुम्ही क्षमा मागणार नाही, तोवर आम्ही सोनी टीव्हीवर बहिष्कार घालण्याची मागणी कायम ठेवू. आमचे पत्र आम्ही सामाजिक माध्यमे आणि टपालाने तुम्हाला पाठवू !’ त्यानंतर रात्री ८ वाजता सोनी टीव्हीने त्यांच्या सामाजिक माध्यमाच्या अधिकृत खात्यावरून ‘क्राईम पॅट्रोल या मालिकेत दाखवण्यात आलेल्या भागातून कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर आम्ही खेद व्यक्त करत आहोत’, अशा स्वरूपाचे लिखाण प्रसारित केले. तसेच त्यांच्या सर्व प्रकारच्या व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरून तो वादग्रस्त २१२ क्रमांकाचा भाग (एपिसोड) हटवण्यात आला. त्याच्या आधीचा २११ आणि नंतरचा २१३ भाग उपलब्ध आहे; मात्र २१२ भाग उपलब्ध नाही.
४. धर्मकर्तव्य म्हणून कृती करणे महत्त्वाचे !
‘सोनी टीव्हीच्या कार्यालयात केवळ ३ जणांनी जाणे आणि सामाजिक माध्यमांवर हिंदूंनी जोरदार विरोध करणे, एवढ्या कृतींनीही आपण सोनी टीव्हीसारख्या मोठ्या आस्थापनाला नमवू शकतो’, ही हिंदूसंघटनाची शक्ती आहे. त्यामुळे देश आणि धर्म यांवरील लहानात लहान आक्रमणही सोडून देऊ नका. त्या विरोधात वैध मार्गाने लढा देणे आवश्यक आहे. त्यात यश मिळो न मिळो, आपण आपले धर्मकर्तव्य म्हणून कृती करत राहूया. काही ठिकाणी यश मिळणारही नाही; पण धर्मविरोधकांशी वैध मार्गाने कसे लढायचे, याचा अनुभव मात्र नक्की मिळत राहील की, जो पुढच्या धर्मलढ्यासाठी उपयुक्त राहील. आपण हिंदु अन्य धर्मियांच्या भावना दुखवायला कधी जात नाही; पण आपल्या धर्माच्या वाटेला जर कुणी जात असेल, त्याला वैध मार्गाने योग्य तो संदेश दिलाच पाहिजे.’
जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् । – श्री. नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.
संपादकीय भूमिकादेश आणि धर्म यांवरील आघातांना रोखण्यासाठी ईश्वरी अधिष्ठान ठेवून लढा दिल्यास त्यात यश नक्कीच मिळते, हे लक्षात घ्या ! |