रांची (झारखंड) – झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) विशेष न्यायालयाने समन्स बजावले आहे. माजी राष्ट्रीय नेमबाज तारा सहदेव आणि रकीबुल हसन उपाख्य रणजीत कोहली यांच्या प्रकरणी सीबीआयने त्यांना समन्स बजावले आहे. धर्मांतर, लैंगिक छळ आणि हुंडाबळीचा हा खटला असून त्यात मुख्यमंत्री सोरेन यांना साक्षीदार बनवण्यात आले आहे. रकीबुल अनेक दिवसांपासून अटकेत आहे. त्याने न्यायालयात दिलेल्या साक्षीदारांच्या सूचीमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे नाव आहे. ते रकीबुल हसन याच्या घरी एका कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते, असे सांगण्यात येते. त्या वेळी ते विरोधी पक्षनेते होते.
झारखंड के सीएम हेमंत सोरेन को CBI ने पूर्व राष्ट्रीय शूटर तारा शाहदेव और रंजीत कोहली के धर्म परिवर्तन, यौन उत्पीड़न व दहेज प्रताड़ना केस में समन भेजा है.#Jharkhand #HemantSoren #Conversion #CBIhttps://t.co/i68mM9Gdf8
— ABP News (@ABPNews) May 4, 2023
रणजीत कोहली आणि तारा सहदेव यांचा विवाह ७ जुलै २०१४ या दिवशी झाला होता. तारा सहदेव यांनी, ‘मी ज्या व्यक्तीला रणजीत समजले तो वास्तविक रकीबुल हसन होता. विवाहानंतर त्याने हुंडा मागितला आणि धर्मांतरासाठी माझा छळही केला’, अशी तक्रार केली होती.