‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यात प्रशासन, पोलीस, शाळा-महाविद्यालये येथे निवेदने !

पुणे – स्वैराचाराचे समर्थन करून तरुण पिढीला चुकीच्या मार्गावर नेण्याचे षड्यंत्र म्हणजे व्हॅलेंटाईन डे ! या ‘व्हॅलेंटाईन डे’मुळे शाळा आणि महाविद्यालये यांच्या परिसरातील कायदा अन् सुव्यवस्था, तसेच शैक्षणिक वातावरण बिघडवणारी स्वैराचारी वृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे जिल्ह्यात प्रशासन, पोलीस, शाळा-महाविद्यालये येथे एकूण ५० हून अधिक ठिकाणी देण्यात आले.

पुणे जिल्ह्यात देण्यात आलेली निवेदने

जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष कार्यकारी दंडाधिकारी श्री. धनंजय जाधव यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे शिष्टमंडळ

१. जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष कार्यकारी दंडाधिकारी श्री. धनंजय जाधव यांना निवेदन देण्यात आले.
२. सिंहगड रस्ता येथील नगरसेविका ज्योती गोसावी यांना निवेदन देण्यात आले. त्यांच्या वतीने त्यांच्या सहकार्‍यांनी निवेदन स्वीकारले.
३. पोलीस उपायुक्त, विशेष शाखा, पुणे यांच्या कार्यालयात निवेदन दिले.
४. शिक्षणाधिकारी, शिक्षण विभाग (प्राथमिक), तसेच (माध्यमिक) पुणे महापालिका यांच्या कार्यालयात निवेदने देण्यात आली.
५. ‘सोनाई इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज’, भेकराईनगर, हडपसर येथे निवेदन देण्यात आले. त्यानुसार या शाळेतील मुले आणि मुली यांसाठी २ स्वतंत्र व्याख्याने घेण्यात आली.
६. आंबेगाव पठार येथील ‘महर्षी कणाद अकॅडमी’चे श्री. अमोल गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.वैशिष्ट्यपूर्ण

१. ‘सोनाई इंग्लीश मिडियम स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज’, या शाळेतील इयत्ता ७ वी ते ९ वी या इयत्तांमधील मुलींसाठी व्याख्यान घेण्यात आले. या वेळी २५० हून अधिक मुली उपस्थित होत्या. व्याख्यान झाल्यावर सर्वांनी १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा न करता, ‘मातृ-पितृ पूजनदिन’ साजरा करायचे ठरवले. सर्वांनी प्रतिदिन कुंकू लावण्याचे आणि कुलदेवीचा नामजप करण्याचे ध्येय घेतले. तसेच सर्व मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून राष्ट्ररक्षणासाठी सिद्ध होण्याचे ध्येय घेतले.

आंबेगाव पठार येथील प्रेरणा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात व्याख्यानाला उपस्थित विद्यार्थी

२. आंबेगाव पठार येथील प्रेरणा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणारे अपप्रकार’ या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. या वेळी शाळेतील एकूण ५०० विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या. धर्मशिक्षणवर्गात नुकत्याच सहभागी झालेल्या सौ. दीपाली कोकाटे यांनी या व्याख्यानाचे आयोजन केले होते.

‘महर्षि कणाद ॲकॅडमी’चे श्री. अमोल गायकवाड यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीच्या कु. क्रांती पेटकर

३. ‘महर्षि कणाद ॲकॅडमी’चे श्री. अमोल गायकवाड यांनी ‘मी इयत्ता १० वीपासून रा.स्व. संघाच्या कार्यात सहभागी आहे. त्यामुळे मीसुद्धा विद्यार्थ्यांमध्ये हिंदु धर्माच्या संदर्भात जागृती करण्यासाठी प्रयत्न करत असतो’, असे सांगितले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमालाही उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यास सांगितले.