व्‍यक्‍तीद्रोह, राष्‍ट्रद्रोह आणि धर्मद्रोह यांतील भेद !

कु. मधुरा भोसले

१. व्‍यक्‍तीद्रोह

१ अ. व्‍याख्‍या : एखाद्या व्‍यक्‍तीच्‍या विचारसरणीचा, चरित्राच्‍या किंवा तिच्‍या कृतींच्‍या विरोधात केलेल्‍या कृतींना ‘व्‍यक्‍तीद्रोह’ म्‍हणतात. चांगल्‍या व्‍यक्‍तींना विरोध केल्‍याने पाप लागते.

१ आ. उदाहरणे : उदा. काँग्रेसने स्‍वातंत्र्यवीर सावरकर, क्रांतीवीर भगतसिंह आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची विचारसरणी अन् कार्य यांना विरोध करणे अयोग्‍य होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या राष्‍ट्र आणि धर्म विषयक कार्याला काँग्रेस अन् काही कट्टरपंथीय विरोध करतात. याला ‘व्‍यक्‍तीद्रोह’ म्‍हणतात.

१ इ. परिणाम : चांगल्‍या व्‍यक्‍तींचा द्रोह केल्‍यामुळे समष्‍टीची हानी होते आणि द्रोह करणार्‍याला पाप लागते.

२. राष्‍ट्रद्रोह

काही जण राजकीय सत्तेविरुद्ध बंड पुकारण्‍याला ‘राष्‍ट्रद्रोह’ म्‍हणतात; परंतु ही व्‍याख्‍या योग्‍य नाही. जर राष्‍ट्रावर अधिपत्‍य असणारी सत्ता भ्रष्‍ट किंवा अत्‍याचार करणारी असेल, तर तिच्‍या विरुद्ध केलेले बंड हा राष्‍ट्रद्रोह नसून ती एक प्रकारची राष्‍ट्रसेवा आहे.

२ अ. व्‍याख्‍या : राष्‍ट्रहिताच्‍या विरुद्ध कार्य केले, तर त्‍याला ‘राष्‍ट्रद्रोह’ म्‍हणतात.

२ आ. उदाहरणे : उदा. एखाद्या राष्‍ट्राच्‍या मानचिन्‍हाचे विडंबन करणे, एखाद्या राष्‍ट्राचा नकाशा चुकीचा प्रसिद्ध करणे, एखाद्या राष्‍ट्राच्‍या विरुद्ध आतंकवादी कारवाया करणे इत्‍यादी.

२ इ. परिणाम : यामुळे मध्‍यम स्‍वरूपाचे पाप लागते.

३. धर्मद्रोह

३ अ. व्‍याख्‍या : एखाद्या धर्माच्‍या श्रद्धास्‍थानांचे किंवा पवित्र चिन्‍हांचे विडंबन करणे, एखाद्या धर्माची शिकवण विकृत रूपात मांडणे इत्‍यादी, म्‍हणजे एखाद्या धर्माच्‍या विरोधात कृती करणे याला ‘धर्मद्रोह’ म्‍हणतात.

३ आ. उदाहरणे : उदा. हिंदुद्वेष्‍टे चित्रकार म.फि. हुसेन याने हिंदु धर्मातील देवतांची विकृत आणि नग्‍न रूपात चित्र रेखाटून धर्मद्रोह केला. अंनिसप्रमाणे काही पुरोगामी संघटना ‘हिंदु धर्माची यज्ञसंस्‍था, श्राद्धादी विधी थोतांड आणि अनावश्‍यक आहेत’, असे सांगून हिंदु धर्माची हानी करतात.

३ इ. परिणाम :धर्मद्रोह करणार्‍या व्‍यक्‍तीला महापाप लागते.

४. व्‍यक्‍तीद्रोह , राष्‍ट्रद्रोह आणि  धर्मद्रोहयातील भेद

टीप – वरील सारणी चांगली व्‍यक्‍ती, राष्‍ट्र आणि धर्म यांच्‍या विरोधात कृती केल्‍यास आध्‍यात्मिक स्‍तरावर जे परिणाम होतात त्‍याविषयी आहे. (१४.११.२०२१)

 – कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.