तहसीलदार कार्यालयाने छत्तीसगड वक्फ बोर्डाचा दावा फेटाळला !

  • दुर्ग (छत्तीसगड) येथील भूमीवर वक्फ बोर्डाने दावा केल्याचे प्रकरण

  • हिंदूंच्या संघटित प्रयत्नांना यश !

दुर्ग (छत्तीसगड) – काही दिवसांपूर्वी छत्तीसगड राज्य वक्फ बोर्डाने येथील तहसीलदार कार्यालयाकडे दुर्ग शहरातील शेकडो एकर भूमीवर स्वामित्वाचा दावा केला. त्यानंतर तहसील कार्यालयाने स्थानिक नागरिकांना नोटीस बजावून हरकती मागवल्या. वक्फ बोर्डाच्या दाव्याला हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह शेकडो हिंदूंनी मोठ्या प्रमाणात विरोध केला. हिंदूंच्या या संघटित प्रयत्नांना ईश्‍वरकृपेने यश मिळाले असून येथील तहसीलदार कार्यालयाने छत्तीसगड राज्य वक्फ बोर्डाचा दावा फेटाळून लावला आहे.

तहसील कार्यालयाच्या आवाहनानंतर १ सहस्र ७०० हून अधिक हरकती प्राप्त झाल्या. त्यानंतर कार्यालयाने हा निर्णय घेतला. सद्यस्थितीत स्थानिक हिंदु नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी वक्फ बोर्डाने त्यांचा दावा मागे घेतला नाही.

 

संपादकीय भूमिका

  • वक्फ कायद्याच्या तरतुदी आणि त्या माध्यमातून वक्फ बोर्डाला मिळालेले अमर्याद अधिकार पहाता हिंदूंनी बेसावध राहून चालणार नाही. हिंदूंनी अल्पसंतुष्ट न रहाता हा ‘वक्फ कायदा’ रहित होईपर्यंत वैध मार्गाने संघटित लढा चालू ठेवायला हवा !